दूध, साखर घालून चहा पिणा-या भारतीय लोकांनी हळूहळू ग्रीन टी पिण्यास सुरूवात केली. पाहायला गेले तर भारतीय चहाच्या तुलनेत हा चहा बेचवच. पण, असे असले तरी ग्रीन टीचे सेवन केल्याने आरोग्याला याचे खूप फायदे होतात. म्हणूनच ग्रीन टी पिण्याचा सल्ला दिला जातो. वजन घटवणे, निद्रानाश, तणाव दूर करणे असे अनेक फायदे ग्रीन टीचे आहेत. पण तिचे सेवन करताना काही गोष्टी करणे आवश्यक आहे. तरच त्याचा आरोग्याला फायदा होऊ शकतो.

वाचा : वजन घटवण्यासोबतच ग्रीन टीचे असेही काही फायदे

ग्रीन टी बनवताना या गोष्टी करा
* ग्रीन टीमुळे जरी वजन कमी होत असले तरी तिचे सेवन दिवसातून किती वेळा करावे याबद्दल डॉक्टरांकडून आवश्य सल्ला घ्या. दिवसातून एकदा तिचे सेवन करणे जास्त फायद्याचे ठरेल.
* ग्रीन टी वारंवार उकळू नका. एकदा ग्रीन टी बनवल्यानंतर लगेचच तिचे सेवन करा. ती ठेवून देऊ नका.
* आधी पाणी उकळून घ्या. त्यानंतर त्यात ग्रीन टी पावडर किंवा टी बॅग टाका. हे झाल्यानंतर काही सेकंदात गॅस बंद करा. एकदा पावडर टाकली की नंतर चहा उकळू नका.
* ग्रीन टी ही बेचव असते. त्यामुळे तिला अधिक चांगली चव येण्यासाठी अनेक जण त्यात साखर किंवा गूळ टाकतात. पण असे केल्याने त्यातले पोषक तत्वे कमी होतात. त्यामुळे कधीच त्यात साखर किंवा तत्सम गोड पदार्थ टाकू नका.
* ग्रीन टी ही दूध किंवा साखर टाकून बनवायची नसते हे लक्षात घ्या. त्यामुळे ती बनवताना त्यात दूधही टाकू नका.
* ग्रीन टीचे प्रकार वेगवेगळे आहे. तुळस, लिंबू, पुदिना, जास्मिन अशा शेकडो प्रकारात ग्रीन टी उपलब्ध आहे. या प्रत्येक प्रकाराचे फायदेही वेगळे आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की कोणत्या आरोग्याच्या समस्येसाठी त्याचे सेवन करत आहात हे देखील पाहून घ्या.

VIRAL : ‘या’ देशात समोसा खाण्यावर आहे बंदी

Story img Loader