बर्मिंगहॅममध्ये सुरु असणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतीय खेळाडू सुवर्ण कामगिरी करत आहेत. अनेक खेळाडूंचे नाव यामुळे सामन्यांच्या सुद्धा सर्च लिस्ट मध्ये पाहायला मिळते. मात्र अशात कॉमनवेल्थ मधील एक गोल्ड मेडलिस्ट वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. कॅनेडियन स्टार खेळाडू अलिशा न्यूमन हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. २८ वर्षीय अलिशा हि खेळासोबतच मॉडेलिंग सुद्धा करते, काही दिवसांपूर्वी तिने शरीरावर रंग लावून आपले न्यूड बोल्ड फोटोशूट केले होते जे तिने आपल्या OnlyFans पेजवर शेअर केले होते. यानंतर सोशल मीडियावर हे फोटो प्रचंड व्हायरल होऊलागले .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये पोल व्हॉल्ट स्पर्धेत आलिशाने गोल्ड मेडल जिंकले होते, याशिवाय तिने दोनदा ऑलिम्पिक मध्ये सुद्धा कॅनडाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र खेळातील करिअर व्यतिरिक्त एक बोल्ड मॉडेलिंग करिअर सुद्धा अलिशाने तयार केले आहे. तिने २०२१ मध्ये आपले ONLYFANS अकाउंट तयार केले होते. अडल्ट कॉन्टेन्टच्या या वेबसाईटवर काहीच महिन्यात आलिशाचे २१ हजारहून अधिक फॉलोवर्स आहेत

आलिशा न्यूमनचा बोल्ड अंदाज

पण बरं का मंडळी आलिशा न्यूमनच्या OnlyFans अकाउंटवर पोहचणे सुद्धा खर्चिक आहे. आलिशा या माध्यमातून प्रतिवर्ष 850,000 पाउंड इतकी कमाई करते.

आलिशा अनेकदा आपल्या सोशल मीडियावर बॉडी पॉझिटिव्हिटी विषयी बोल्ट असते, जर मी माझ्या सीमा पार केल्या नाहीत तर मी स्वतःला बांधून ठेवेन जे की मला करायचे नाही, मला फक्त जिंकण्याच्या हेतूने खेळायची सवय आहे असे आलिशा नेहमी आपल्या फॅन्सना सांगत असते.

दरम्यान आलिशा यावर्षी बर्मिंघम मध्ये होणाऱ्या स्पर्धेत सुवर्ण पदाच्या शर्यतीत आहे. ग्लासग्लोव्ह मध्ये कांस्य व गोल्ड कोस्ट मध्ये सुवर्ण पदक जिंकल्यावर बर्मिंघम मध्ये आलिशा काय कमाल करते यावर सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commonwealth gold medalist alysha newman posed naked on onlyfans svs