मुलांनी एखादी महागडी वस्तू मागीतली की आई-वडील सर्रास म्हणतात, घरात काय पैशांचा पाऊस पडतोय का? खरं तर आपल्यापैकी अनेक जण पैशांचा पाऊस खरंच पडतो की काय? असा विचार करत लहानाचे मोठे झाले असतील. पण ही केवळ कल्पना नाही, परिकथांप्रमाणेच खरंच एखाद्या ठिकाणी पैशांचा पाऊस पडला तर… हो असाच काहीसा प्रकार प्रत्यक्षात घडलाय. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागलाय. कॅलिफोर्निया हायवेवर अचानक हवेतून डॉलरचा पाऊस सुरू झाला. हे पाहून हायवेवरून जाणारे लोक आपआपल्या गाडीतून रस्त्यावर उतरत नोटा गोळा करू लागले. त्यामूळे हायवेवर बराच वेळ ट्रॅफिक जॅम झालं होतं. हे वाचून तुम्हाला विश्वास नाही बसणार. यासाठी हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ दक्षिणी कॅलिफोर्नियामधला असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या शुक्रवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास हायवेवरून एक ट्रक डिएगो ते फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पच्या दिशेने जात होतं. ट्रकमध्ये ठेवलेल्या अनेक पिशव्या अचानक फुटल्या आणि दक्षिण कॅलिफोर्नियातील या हायवेवर डॉलरच्या नोटा हवेत उधळल्या. रस्त्यावर या डॉलरच्या नोटांचा अक्षरशः ढीग साचला होता. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दूर-दूरवरून लोक या डॉलरच्या नोटा जमा करण्यासाठी धावत आहेत. रस्त्यावर नुसता पैसाच पैसा पाहून हे लोक पैसे मिळाले म्हणून आपल्या दोन्ही हातांनी नोटा हवेत उधळताना दिसून येत आहेत. यातील बहुतांश नोटा या एक डॉलर ते २० डॉलरच्या होत्या.

‘डेमी बॅग्बी’ नावाच्या बॉडीबिल्डरने या घटनेचा व्हिडीओ शूट केला असून तो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अनेक वाहनांची रांग लागलेली दिसून येत आहे. रस्त्यावर नोटांचा सडा पडलेला दिसून येत आहे आणि तिने स्वतः नोटा हातात धरल्या आहेत. तिच्या हातात नोटा घेऊन ती म्हणते, “मी आतापर्यंत पाहिलेली ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे. रस्त्यावरून पैसे घेण्यासाठी प्रत्येकजण आपली कार थांबवत आहे.”

आणखी वाचा : पाठीवर दप्तर घेऊन सायकल चालवणाऱ्या माकडाचा हा VIRAL VIDEO पाहाच…; नेटकरी हसून लोटपोट

आणखी वाचा : VIDEO VIRAL : ससा आणि ट्रेनमध्ये रंगली शर्यत ? आयुष्याच्या शर्यतीत पाहा कुणी मारली बाजी…

अनेकांनी अधिकाऱ्यांना पैसे परत केले

रस्त्यावर अचानक फुकट पैसे मिळाल्याचा लोकांचा आनंद फार काळ टिकला नाही. मात्र, अधिकाऱ्यांनी लोकांना पैसे परत करण्याचं आवाहन केलं. सॅन डिएगो ट्रिब्यूनच्या म्हणण्यानुसार, या घटनेत किती पैसे गमावले हे त्यांनी सांगितले नाही. शुक्रवारी दुपारपर्यंत अनेक लोकांनी रस्त्यावरून उचललेली रोकड कॅलिफोर्निया हायवे पेट्रोल (CHP) ला परत केली होती. ते म्हणाले की, लोकांनी मोठ्या प्रमाणात नोटा उचलल्या होत्या आणि त्या परतही करत आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रकचे एक गेट अचानक उघडले. त्यामुळे आत नोटांनी भरलेल्या पिशव्या बाहेर पडल्या. घटनास्थळी दोघांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. लोकांना इशारा देण्यात आला आहे की जर कोणी पैसे घेताना आढळले तर त्यांच्यावर फौजदारीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. घटनेनंतर दोन तासांनी महामार्ग खुला करण्यात आला.

Story img Loader