सोशल मीडियावर रोज बऱ्याच गोष्टी व्हायरल होत असतात. त्यातल्या काही गोष्टी मनोरंजन करणाऱ्या तर काही धडा शिकवणाऱ्या असतात. असेच एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. हे पत्र राजस्थानमधील एके स्पिनटेक्स (AK Spintex) या कंपनीचे आहे. या कंपनीच्या अधिकृत पत्रात कंपनीच्या प्रमोटर असणाऱ्या व्यक्तीच्या निधनाची बातमी देण्यात आली आहे. पण ही बातमी देताना या पत्रातील मजकुरामध्ये खूप मोठी चूक झाली, ज्यामुळे हे पत्र सध्या व्हायरल होत आहे.
हे पत्र एके स्पिनटेक्स कंपनीकडून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पाठवण्यात आले होते. या पत्रात कंपनीच्या प्रमोटर असणाऱ्या व्यक्तीच्या निधनाची बातमी एखाद्या आनंदाच्या बातमीप्रमाणे देण्यात आली आहे. ‘आम्हाला कळविण्यास आनंद होत आहे की आमच्या कंपनीच्या प्रमोटर श्रीमती सरोज देवी छाब्रा यांचे निधन झाले आहे.’ असा मजकूर पत्रात लिहण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीच्या निधनाबाबत माहिती देताना कंपनीच्या अधिकृत पत्रात एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते हा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.
Viral Video : कार स्टंट करायला गेले अन् झाला मनस्ताप; व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
व्हायरल झालेले पत्र :
फक्त कंटेन्ट कॉपी पेस्ट करण्याच्या या सवयीमुळे कंपनीने स्वतःचाच विनोद करून घेतला. निधनाबाबतची माहिती देताना कोणी इतकी मोठी चूक कशी करू शकत असा संताप देखील काही नेटकऱ्यांनी व्यक्त केला. तर काहींनी हा कंपनीचा निष्काळजीपणा असल्याचे म्हटले आहे. एका व्यक्तीने यावर ‘म्हणून इंटरनेटवरील टेम्प्लेट न वाचता वापरू नये’ असा सल्ला दिला आहे. कोणताही मजकूर कॉपी पेस्ट करण्याआधी तपासून घ्यावा, तसेच कोणतेही पत्र पाठवताना त्यातील मजकूर योग्य आहे का याची खात्री करून घ्यावी अशी शिकवण या व्हायरल पत्राने सर्वांना दिली आहे.