सोशल मीडियावर मुंबईतील एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. मुंबईतील एका बांधकाम सुरू असलेल्या उड्डाण पुलावरून एक काँक्रीटचा बीम एका चालत्या कारच्या काचेवर आदळल्याचा थरारक प्रकार घडला. हा काँक्रीटचा बीम थेट काचेच्या आरापास घुसल्याचे दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
धावत्या कारवर कोसळला काँक्रीटचा बीम
रेडिटवर शेअर केलेल्या या तारीख नसलेल्या व्हिडिओमध्ये एका पोलिसासह काही व्यक्ती एका कारच्या बाजूला उभे असल्याचे दृश्य दिसत आहे. कारच्या फुटलेल्या काचेतून काँक्रीटचा बीम आरपार केल्याचे दिसत आहे. कारचा ड्रायव्हर दरवाजा बंद करून गाडीच्या पुढच्या बाजूला जाऊन उभा राहतो. त्या व्यक्तीला धक्का बसल्याचे त्याच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. जवळच एक वृद्ध महिला, जी प्रवासी असल्याचे दिसते, ती देखील थक्क होऊन कारचे निरीक्षण करत आहे. ड्रायव्हर आणि पोलिस वाहनाचे फोटो काढताना दिसत आहे. कॅमेरावरच्या दिशेने फिरतो आणि तेथील उड्डाणपुल दिसतो आहे. पण उड्डाणपुलाचा भाग कारवर पडलेला आहे की नाही हे स्पष्ट नाही.
मुंबईवर पोस्ट केलेल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असा दावा केला आहे की,”ही घटना मीरा रोडवर घडली आणि त्यात सध्या सुरू असलेल्या मुंबई मेट्रो प्रकल्पाचा भाग असलेल्या उड्डाणपुलाचा समावेश आहे. पोस्टनुसार, काँक्रीटचा बीम चालत्या कारवर जाऊन पडला आणि चालक थोडक्यात बचावला.”
पाहा Viral Video
फायनल डेस्टिनेशन चित्रपटाची झाली आठवण
व्हिडिओ रेडिटवर लगेच व्हायरल झाला, धक्कादायक वापरकर्त्यांनी या घटनेची तुलना फायनल डेस्टिनेशन चित्रपटातील दृश्याशी केली ज्यात एकापेक्षा एक विचित्र अपघाता दाखवले आहेत. “हे खूप भयानक आहे. असे दिसते की ते अगदी फायनल डेस्टिनेशन चित्रपटातील दृश्य आहे,” एका वापरकर्त्याने निदर्शनास आणून दिले.
दुसऱ्या वापरकर्त्याने म्हटले की, “अमेरिकेत, ड्रायव्हर खटला दाखल करू शकतो आणि लाखोंचे नुकसान भरपाई मिळवू शकतो, परंतु येथे त्याला त्याची कार दुरुस्त करण्यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करावे लागतील.”
“ड्रायव्हर कंत्राटदारावर खुनाच्या प्रयत्नाचा खटला दाखल करू शकत नाही का? मला माहित आहे की हा अपघात आहे पण इथे कंत्राटदार जबाबदार आहे,” असे तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.