Condom Pharmacy Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. आजकाल स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोक आगळेवेगळे प्रयोग करून बघतात आणि प्रसिद्धी मिळवतात.
सोशल मीडियावर आपल्या नवीन व्यवसायाच्या उद्घाटनाचे व्हिडीओ शेअर करतात आणि व्हायरल होऊन जातात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्यात काही तरुणांनी एक आगळा वेगळा व्यवसाय सुरू केलाय. नेमकं काय आहे हा व्यवसाय, जाणून घेऊ या…
तरुणांचा व्हायरल व्यवसाय (Condom Pharmacy Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच पोट धरून हसाल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एका नवीन फार्मसीचा उद्घाटन सोहळा सुरू आहे. या दुकानात औषध नाहीत किंवा कोणतेही दुसरे प्रोडक्ट्स नाहीत तर फक्त आणि फक्त कंडोम आहेत. या दुकानाची झलक या व्हिडीओमध्ये दाखवली आहे. यात वेगवेगळे कंडोम्स संपूर्ण दुकानात ठेवले आहेत. या दुकानाचे नावही तितकंच वेगळं आहे. फार्मसी कंडोमवाला असं ठेवण्यात आलं असून, मी द्यायला लाजत नाही, तुम्ही घ्यायला लाजू नका अशी टॅगलाईन देण्यात आली आहे.
तसंच ही फार्मसी पाहायला बाहेर लोकांची गर्दी जमल्याचंदेखील दिसतंय. अनेकजण या दुकानाचे फोटो व्हिडीओ काढतानादेखील दिसत आहे. काही तरुणांनी मिळून सुरू केलेला हा फार्मसी व्यवसाय सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @zakasss_memer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “अजून काय काय बघायचं राहिलं आहे काय माहित?” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला २ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “नक्कीच स्थळ पुणे” तर दुसऱ्याने “व्यवसाय असा करा की समाजच तुमची जाहिरात करेल” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “दुकान असं टाका की, कस्टमर यायला घाबरतील” तर एकाने “उदघाटन कोणाच्या हस्ते झालं, घरचे पण आले नसतील शॉपसमोर रांगोळी काढायला” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंटमध्ये “कंडोम घ्या कंडोम” असं म्हणाला.