आनंद हा प्रत्येकालाच हवा हवासा वाटतो पण प्रत्येकाला आनंदाने आयुष्य जगता येतच नाही. रोजच्या धावपळीत अनेक लोक आपल्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद अनुभवणे विसरून जातात. पण काही लोक मात्र प्रत्येक क्षण आनंदाने जगतात आणि सर्वत्र आनंद पसरवतात. असे म्हणतात की आनंद वाटला की आणखी वाढतो. असाच इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद घेऊन येणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो एका कंडक्टरचे चित्र रेखाटतो आणि त्याच्या चेहऱ्यावर आंनद घेऊ येतो. व्हिडिओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल व्हिडीओमध्ये सुरुवातीला दिसते की एका बसमध्ये काम करणारा कंडक्टर दिसतो. खाकी रंगाची कंडक्टरचा युनिफॉर्म घालून तो आपले काम प्रामाणिकपणे करत आहे. कामात हरवलेल्या या कंडक्टरचे चित्र बसमध्ये प्रवास करणारा एक तरुण त्याच्या बसप्रवासाच्या तिकिटावर रेखारटतो. बसमधून उतरल्यानंतर तरुण कंडक्टरजवळ जातो आणि त्याला तिकीट देतो. प्रथम कडंक्टरला वाटते की काहीतरी समस्या आहे पण जेव्हा तो त्याला चित्र काढलेले तिकीट दाखवतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर हसू येतो. कंडक्टरच्या चेहऱ्यावरील आनंद नक्कीच पाहण्यासारखा आहे. तो हसत हसतच तरुणाचे आभार व्यक्त करतो.

व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. नेटकऱ्यांनी तरुणाच्या कौशल्याचे आणि कृतीचे कौतुक केले आहे.

व्हिडिओ इंस्टाग्रामवर infowari नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओवर कमेंट करत एकाने लिहिले की, “खरंच इतक्या कमी वेळात त्याने सुंदर चित्र काढले. दुसऱ्याने कमेंट केली की, “खरंच सुंदर व्हिडिओ आहे.” तिसरा म्हणाला की, “खरंच भारी वाटले भावा बघून” चौथ्याने कमेंट केली की, “खरंच त्या कलाकाराने स्वत:च्या आनंदाबरोबर दुसर्‍यांना पण आनंद दिला आहे”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conductors portrait on ticket wins hearts young artists video goes viral snk