नवी दिल्ली (विश्वास न्यूज): लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये चीनच्या भीतीमुळे अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने एकाही उमेदवाराला तिकीट दिले नसल्याचा दावा केला आहे. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो न्याय यात्रेची’ ईशान्येकडील राज्यापासून सुरुवात करूनही अरुणाचल प्रदेशचा समावेश नव्हता, असा दावाही या पोस्टमध्ये केल्याचे आढळते. विश्वास न्यूजने केलेल्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. 

काय होत आहे व्हायरल?

सोशल मीडिया यूजर ‘I HATE AAP PARTY’ ने व्हायरल पोस्ट शेयर करत दावा केला आहे की, काँग्रेस पार्टीने चीनच्या भीतीने अरुणाचल प्रदेशमध्ये आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले नाहीत. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इतर अनेक वापरकर्त्यांनी याच दाव्यांसह पोस्ट शेअर केली आहे.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
Underground sewage Scheme , Sulabha Khodke ,
अमरावती : आजी-माजी आमदारांमध्ये जुंपली… ‘हे’ आहे कारण
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Evidence that Vishal Gawli of Kalyan is mentally ill kalyan news
कल्याणच्या विशाल गवळीकडे मनोरुग्ण असल्याचे दाखले;  याच आधारावर यापूर्वी जामीन मिळविल्याची माहिती
dhotar culture wardha
धोतर वस्त्र प्रसार अभियान; धोतर घाला, संस्कृती पाळा

तपास:

निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेनुसार अरुणाचल प्रदेश (अरुणाचल पश्चिम, अरुणाचल पूर्व) लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी १९ एप्रिल २०२४ रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.

https://x.com/ECISVEEP/status/1772175176202936376

यानंतर आम्ही या दोन जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी तपासली. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेश (पूर्व) लोकसभा मतदारसंघातून एकूण १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी १० उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. बोशीराम सिरम हे या जागेवरून काँग्रेसचे उमेदवार आहेत. नबाम तुकी हे अरुणाचल प्रदेश (पश्चिम) लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत.

लोकसभा निवडणुकीसह अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकाही होत आहेत. राज्यात विधानसभेच्या एकूण ६० जागा आहेत आणि एएनआयच्या रिपोर्टनुसार काँग्रेसने एकूण ३४ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत.

https://perma.cc/EBT2-VWRY

म्हणजेच चीनमुळे काँग्रेस अरुणाचल प्रदेश विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढवत नाही हा दावा चुकीचा आहे.

व्हायरल पोस्टमधील दुसरा दावा असा आहे की, ईशान्येतून सुरुवात करूनही राहुल गांधींची “भारत जोडो न्याय यात्रा” अरुणाचल प्रदेशातून गेली नाही. यासंदर्भात तपासाच्या आम्हाला अशा अनेक बातम्या सापडल्या ज्यात राहुल गांधींच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्याचा उल्लेख आहे.

CNBC18.com च्या २० जानेवारी २०२४ च्या अहवालानुसार, राहुल गांधींची “भारत जोडो न्याय यात्रा” आसाममार्गे अरुणाचल प्रदेशात पोहोचली होती, जिथे अरुणाचल प्रदेश काँग्रेसचे प्रमुख नबाम तुकी यांनी राहुल गांधींचे स्वागत केले होते. व्हायरल पोस्टमध्ये केलेल्या दोन्ही दाव्यांबाबत आम्ही नबाम तुकी यांच्याशी संपर्क करून चर्चा केली. व्हायरल दावा खोटं असल्याचं सांगत त्यांनी सुद्धा “काँग्रेस अरुणाचल प्रदेशात लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका लढवत आहे.”याची पुष्टी केली.

ज्या ग्रुपमध्ये व्हायरल पोस्ट शेअर करण्यात आली आहे तो पब्लिक ग्रुप आहे, ज्यामध्ये तीन हजारांहून अधिक सदस्य आहेत.

निष्कर्ष : अरुणाचल प्रदेश लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने चीनमुळे उमेदवारांना तिकीट न दिल्याचा दावा चुकीचा आहे. काँग्रेस लोकसभेच्या दोन्ही जागांवर निवडणूक लढवत असून एकूण ६० जागांच्या विधानसभेतील ३४ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढणार आहेत. तसेच राहुल गांधींची “भारत जोडो न्याय यात्रा” अरुणाचल प्रदेशातून गेली नसल्याचा दावाही चुकीचा आहे. आसाममधून सुरुवात केल्यानंतर या प्रवासाचा पुढचा मुक्काम अरुणाचल प्रदेश येथे होता.

(ही कथा मूळतः विश्वास न्यूजने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ता पुनर्प्रकाशित केली आहे.)

अनुवाद- अंकिता देशकर

Story img Loader