भारताची चांद्रयान ३ मोहिम यशस्वी झाली आणि संपूर्ण जगाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचं चांद्रयान उतरताना पाहिलं. यानंतर सर्वच स्तरातून इस्रोवर अभिनंदानाचा वर्षाव होत आहे. अशातच काँग्रेसचे नेते आणि राजस्थानचे क्रिडामंत्री अशोक चंदना चांद्रयान ३ मोहिमेवर दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे जोरदार ट्रोल झाले आहेत. चंदना यांनी भारताच्या या मोहिमेचं वर्णन करताना चांद्रयानातून चंद्रावर गेलेल्या प्रवाशांना सलाम असं म्हटलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अशोक चंदना यांनी चांद्रयान ३ चंद्रावर उतरण्याआधी माध्यमांशी बोलताना एक प्रतिक्रिया दिली होती. तो व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यात ते म्हणाले, “आपल्याला यश मिळालं आणि सुरक्षित लँडिंग झालं, तर चांद्रयानातून चंद्रावर गेलेल्या प्रवाशांना मी सलाम करतो. आपला देश विज्ञान आणि अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. यासाठी मी सर्व देशवासीयांचे अभिनंदन करतो.”

दरम्यान, चांद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर राजस्थानचे क्रिडामंत्री अशोक चंदना यांनी ट्वीट करत इस्रोचं अभिनंदन केलं. ते म्हणाले, “अभिमानास्पद क्षण. चांद्रयान ३ मोहिम यशस्वी केल्याबद्दल इस्रोच्या शास्त्रत्रांचं खूप खूप अभिनंदन. त्यांच्या कष्ट आणि संघर्षाने सर्व देशवासीयांची सन्मान वाढवला आहे.”

हेही वाचा : Photos : चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताना शेवटच्या २२ सेकंदात नेमकं काय घडलं? पाहा…

अशोक चंदना यांचा चांद्रयान ३ मधून चंद्रावर गेलेल्या प्रवाशांना सलाम करणारं वक्तव्य करणारा हा व्हिडीओ भाजपा समर्थकांसह सोशल मीडिया युजर्स मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. तसेच त्या यानात कोणताही मानव नसताना केलेल्या या वक्तव्यावरून सडकून टीका करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader trolled over his comment on chandrayaan 3 mission pbs