Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच अपयश, संघर्ष हा वाईट नसतो, खरतंर हेच आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. त्याची ही धडपड आणि प्रचंड इच्छाशक्ती पाहून नेटकरी तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहेत. चिमुकल्याची ही धडपड आणि प्रयत्न पाहून नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. हरलेला डाव चिमुकल्यानं कसा जिंकला हे पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे जोरदार व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर माणूस काहीही करू शकतो याचा अंदाज हा व्हायरल व्हिडीओ पाहून लावता येतो. आजच्या जगात प्रत्येकजण यशाच्या मागे धावत असतो. मात्र, प्रत्येकालाच यश मिळते असे नाही. त्यासाठी प्रयत्न करूनही अनेकजण कंटाळतात. मात्र, जे सातत्याने प्रयत्न करत असतात, त्यांना नक्कीच यश मिळते. खेळात कोणीतरी जिंकतं तर कोणी पराभूत होतं. हार जीत हा खेळाचा भागच आहे. मात्र, शेवटपर्यंत जो संयम ठेवून प्रयत्न करतो तो जिंकतोच. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये टेबल टेनीसच्या स्पर्धेत एक स्पर्धक हरणार होता मात्र नंतर असं काही घडलं ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही.

“हरलेला डावही जिंकता येतो”

हरलेला डावही जिंकला येतो याचं एक उदाहरण या व्हिडीओतून समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन लहान मुलं खेळत आहेत, यावेळी एका मुलाचा स्कोर जास्त आहे तर एकाचा कमी आहे. हे पाहून ज्याचा स्कोर कमी आहे त्याला रडू येतं. त्याला त्याची हार समोर दिसत आणि तो आता काही करुन मला जिंकायचं आहे या भावनेने पुन्हा खेळू लागतो. यावेळी जिंकण्यासाठीची त्याची तळमळ आणि प्रयत्न तुम्ही पाहू शकता. हा चिमुकला इतक्या एकाग्रतेने खेळतो की अक्षरश: हरलेला डाव तो अखेर जिंकतो.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या its_dj_vk_official इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, “शेवटचा पर्याय हा आपल्याला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकतो ” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consistent and self believe key to success best example boy win table tennis match video viral on social media srk