जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे तो ताजमहल. पांढऱ्या शुभ्र संगमरवी दगडाचा हा ताजमहल फक्त प्रेमाचे प्रतिकच नाही तर सौंदर्याचेही प्रतिक मानले जाते. मुघल बादशाह शाहजहानने आपली पत्नी मुमताजची आठवण म्हणून ताजमहल बांधला. भव्यता आणि सुंदरतेमुळे ताजमहलला जगभरात ओळखले जाते. ज्या मुघल स्थापत्य शैलीचे अप्रतिम उदाहरण म्हणून ताज महलकडे पाहिले जाते त्याचे हे बांधकाम खरंच अविश्वसनीय आहे. आपण सर्वच हे भव्य बांधकाम पाहून आवाक् होतो, हा ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांचे हात बादशहा शहाजहानने बांधकाम पूर्ण झाल्यावर कापून टाकले होते अशी एक वंद्यता आहे. दरम्यान वेगवेगळ्या कारणांमुळे ताज महालची चर्चा होतच असते. मात्र सध्या ताजमहाल पुन्हा चर्चेत आला आहे, कारण ताजमहालाचे बांधकाम सुरु असताना ते टप्प्या टप्प्यात कसे दिसत असेल याची कल्पना करुन एका आर्टिस्टनं काही स्केच तयार केले आहेत.

आर्टिफिशल इंटेलिजन्सने (AI) अनेकांचे अख्खे आयुष्यच बदलून टाकले आहे, असे म्हणायला हरकत नाही. या तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल निर्मितीच्या जगातील काही अशक्य गोष्टी शक्यप्राय होताना दिसत आहेत. यात सोशल मीडियावर AI च्या मदतीने काढलेल्या काही हटके फोटोंची यादीच व्हायरल होत आहे. ज्यो जॉन मुल्लूर नावाच्या एका लोकप्रिय कलाकाराने ही आर्टिफिशियल चित्र शेअर केली आहेत. अगदी खरे वाटणारे हे फोटो AI तंत्राचा वापर करून बनवण्यात आले आहेत.

Cyber ​​fraud in the name of deleting obscene videos on social media Mumbai
समाज माध्यमावरील अश्लील चित्रफीत हटवण्याच्या नावाखाली सायबर फसवणूक
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
jain bhavan bhaindar latest news in marathi
भाईंदर: वादात सापडलेल्या ‘महावीर भवनाचा’ कार्यक्रम जैन आचार्यांच्या उपस्थितीत संपन्न
documentary making, Abhijit Kolhatkar, Shilpa Godbole, producer director duo, documentary, Urdu ghazal, Shashikala Shirgopikar, Reverb Production, passion project, artistic journey
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : अद्यायावतीकरणाचा उद्योग…
Badlapur sexual assault case,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू
chhatrapati Shivaji maharaj statue at Rajkot fort Malvan
मालवण राजकोट किल्ल्यावर नौदल अधिकारी, कोसळलेल्या शिव पुतळ्याची केली पाहणी
Will Nifty touch the high mark of 25500
‘निफ्टी’ २५,५०० च्या थराची दहीहंडी फोडणार का?
Illegal constructions, Thane, Thackeray group,
ठाण्यात पुन्हा बेकायदा बांधकामे सुरू, ठाकरे गटाकडून बेकायदा बांधकामाची छायाचित्रे प्रसारित

ताजमहालाच्या बांधकामाचे हे अगदी खरे वाटणारे फोटो –

फोटोंमध्ये ताजमहालाचं बांधकाम सुरु असतानाचे टप्प्याटप्प्यातील काम शेअर केले आहेत. यामध्ये कामगार कठोर मेहनत घेऊन हे बांधकाम करत असल्याचं दिसत आहे. ताजमहालाच्या बांधकामाची भूतकाळातील एक झलक यातून पाहायला मिळते. हे भव्य बांधकाम १६३१ मध्ये सुरु झाले तर १६५३ मध्ये पूर्ण झाले .

पाहा पोस्ट –

हेही वाचा – ‘स्मार्ट चाकू’ बनवणाऱ्या बीडच्या ओंकारची देशभरात चर्चा!; चिमुकल्याच्या प्रयोगाचे होणार राष्ट्रपती भवनात सादरीकरण

हे फोटो पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले. या पोस्टला आतापर्यंत लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत, तर नेटकरी अनेक प्रतिक्रिया यावर देत आहेत.