जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे तो ताजमहल. पांढऱ्या शुभ्र संगमरवी दगडाचा हा ताजमहल फक्त प्रेमाचे प्रतिकच नाही तर सौंदर्याचेही प्रतिक मानले जाते. मुघल बादशाह शाहजहानने आपली पत्नी मुमताजची आठवण म्हणून ताजमहल बांधला. भव्यता आणि सुंदरतेमुळे ताजमहलला जगभरात ओळखले जाते. ज्या मुघल स्थापत्य शैलीचे अप्रतिम उदाहरण म्हणून ताज महलकडे पाहिले जाते त्याचे हे बांधकाम खरंच अविश्वसनीय आहे. आपण सर्वच हे भव्य बांधकाम पाहून आवाक् होतो, हा ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांचे हात बादशहा शहाजहानने बांधकाम पूर्ण झाल्यावर कापून टाकले होते अशी एक वंद्यता आहे. दरम्यान वेगवेगळ्या कारणांमुळे ताज महालची चर्चा होतच असते. मात्र सध्या ताजमहाल पुन्हा चर्चेत आला आहे, कारण ताजमहालाचे बांधकाम सुरु असताना ते टप्प्या टप्प्यात कसे दिसत असेल याची कल्पना करुन एका आर्टिस्टनं काही स्केच तयार केले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा