वडापाव हा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचा आवडीचा पदार्थ आहे. वडापाव हा फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरातील लोकांचा आवडता पदार्थ आहे. वडापाव नुसतं नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. नुकतेच सर्वोत्कृष्ट ५० सँडविचमध्ये वडापावला स्थान मिळाले आहे. परदेशी लोकांनाही वडापावने भुरळ घातली आहे. सोशल मीडियावर अनेक परदेशी इन्फ्लुएंसर किंवा कन्टेंट क्रिएटर अनेकदा वडापाव बनवून त्याचा आस्वाद घेताना दिसतात. सोशल मीडियावर अशाच एका परदेशी इन्फ्लुएंसरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इंस्टाग्रामवर itsnotkadi नावाच्या खात्यावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. Kadi Tucker या कन्टेट क्रिएटरचे हे इंस्टाग्राम खाते आहे जी लॉस एन्जलिस येथे राहते. तिला मराठी भाषा समजते आणि बोलता येते. महाराष्ट्रीय परंपरा, संस्कृती आणि खाद्यपदार्थांचे तिला खास आकर्षण आहे हे तिच्या इंस्टाग्रामवरील पोस्ट पाहिल्यानंतर लक्षात येते. अनेकदा ती तिच्या चाहत्यांबरोबर मराठी भाषेत संवाद साधताना दिसते. तसेच मराठी गाण्यांवर डान्स करताना दिसते. त्याचबरोबर तिला महाराष्ट्रीय नऊवारी किंवा साडी परिधान करायला देखील आवडते.
नुकताच Kadi Tuckerने आपल्या इंस्टाग्रामवर वडापाव बनवताचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. मराठी भाषेत बोलण्याचा प्रयत्न करत वडापावची रेसिपी सांगते आणि करून दाखवते. गरमा गरम वडापाव तयार करून ती त्याचा आस्वाद घेताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी तिचा हा व्हिडिओ खूप आवडला आहे. वडापाव, मराठी भाषा, महाराष्ट्रासाठीचे तिचे प्रेम पाहून अनेक नेटकरी थक्क झाले आहे. व्हिडिओवर कमेंट करत अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
एकाने कमेंट केली की, “तुम्ही मराठी कुठे शिकला?”
दुसऱ्याने कमेंट केली, “वडापाव तयार आहे” हे वाक्य ऐकून खूप छान वाटले.”
तिसऱ्याने कमेंट केली की, “आमच्या महाराष्ट्राचा वडापाव एक नंबर”
चौथ्याने कमेंट केली की, “खूप मस्त! तुम्ही खूप छान मराठी बोलता!”