Viral Video: देशात पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस चढउतार पाहायला मिळतात. त्यामळे पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढल्या की सामान्य नागरिकांचे टेन्शन वाढू लागते. कारण इंधनाच्या दरात वाढ होताच नागरिकांच्या खिशाला कात्री असे चित्र दिसून येते. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची दरवाढ होऊ नये असे प्रत्येक नागरिकाला वाटते. पण, आज सोशल मीडियावर काहीतरी अनोखं पाहायला मिळालं आहे ; जे पाहून तुमचा नक्कीच संताप होईल. दोन तरुण रील बनवण्यासाठी पेट्रोल पंपावर इंधनाचा दुरुपयोग करताना दिसले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या हट्ट अनेक कन्टेन्ट क्रिएटरला अडचणीत आणतो हे आज व्हायरल व्हिडीओत पाहायला मिळालं आहे. व्हायरल व्हिडीओ राजस्थानचा आहे. दोन तरुण रील व्हिडीओ शूट करण्यासाठी पेट्रोल पंपावर येतात. एक तरुण रील व्हिडीओसाठी स्वतःची एसयूव्हीची (SUV) गाडीत डिझेल भरताना दिसत आहे. डिझेल भारण्यापर्यंत तर ठीक आहे. पण, तरुण स्वतःच्या एसयूव्हीची टाकी ओव्हरफिल करताना आणि डिझेल वाया घालवताना दिसला आहे ; ज्यामुळे सर्व नेटकऱ्यांचा संताप होत आहे. नक्की काय घडलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…मुसळधार पावसात बैलाने घेतला कॅफेचा आश्रय; छत्री घेऊन मालकीण आली अन्… पाहा धक्कादायक VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, दोन तरुण एसयूव्ही वाहनात डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर आलेले असतात आणि रीलच्या हट्टापाई ते डिझेल वाया घालवताना दिसतात. आश्चर्याची बाब म्हणजे तेथे उपस्थित एक कर्मचारी सुद्धा हे सगळं पाहत असतो. पण, तो दोन्ही तरुणांना एका शब्दाने काहीही बोलत नाही. तसेच हे दोघे एवढ्यावरचं थांबले नाहीत. तर चालत्या वाहनाच्या सनरूफमधून एक तरुण डोक बाहेर काढून, गळ्यात घातलेली सोन्याची चैन दाखवत तरुण मद्याचे सेवन करतानाही दिसले आहेत; जे खुपचं चुकीचे आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नागरिकांनी रिपोस्ट केला आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केला .

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Nishantjournali या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजस्थान पोलिसांनी सुद्धा दखल घेतली आहे. त्यांनी व्हिडीओखाली, ‘या प्रकरणी एमव्ही कायद्यान्वये वाहन जप्त करण्यात आले असून तरुण व पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई सुरू आहे’ ; अशी कमेंट केली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. एकूणच या प्रकरणाने अनेकांना विचार करायला भाग पाडलं आहे.