आपल्याकडे कधी आंबा खाण्याची, तर कधी पाणीपुरी खाण्याची अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये सहभागी होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असते. दिल्लीत नुकतीच अशाप्रकारची एक स्पर्धा आयोजित कऱण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागींना जास्तीत जास्त चिली बर्गर खाण्याचे टार्गेट देण्यात आले होते. जो सर्वाधिक बर्गर खाईल त्याला पारितोषिकही देण्यात येणार होते. मात्र या अनोख्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावलेल्या गर्व गुप्ता या मुलाला मात्र मोठी किंमत मोजावी लागली. त्याच्या पोटाला झालेल्या इजेमुळे ही स्पर्धा त्याला चांगलीच महागात पडल्याचे दिसून आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्यांमध्ये जास्तीत जास्त चिली बर्गर खाणाऱ्यांसाठी विशेष बक्षिसही ठेवण्यात आले होते. यामध्ये पहिला क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकाला एका महिन्यासाठी मोफत जेवण देण्यात येणार होते. मात्र अशाप्रकारे एकामागे एक बर्गर खाल्ल्यानंतर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पहिला क्रमांक पटकावलेल्या गर्वच्या पोटात अचानक दुखू लागले आणि त्याला उलट्यांचा त्रास व्हायला लागला. या उलट्यांमधून रक्त पडत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तो लगेचच डॉक्टरांकडे गेला तेव्हा एकावेळी खूप जास्त चिली बर्गर खाल्ल्याने हा त्रास उद्भवला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दिल्ली विद्यापीठात शिकत असलेल्या या विद्यार्थ्याची अवस्था पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले. पोटातील फाटलेला भाग शस्त्रक्रियेने ठिक करावा लागणार असल्याचे येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. याविषयी बोलताना डॉ. दिप गोयल म्हणाले, मिरची तिखट असल्याने ती अॅसिडिक असते. एकावेळी इतक्या प्रमाणात तिखट मिरची खाल्ल्याने पोटातील अस्तराला इजा पोहोचली आहे. मात्र अशाप्रकारची चिली बर्गरमुळे उद्भवलेली ही पहिलीच घटना असल्याचेही डॉक्टरांनी यावेळी सांगितले.