स्वयंपाकघरातील महत्त्वाचं भांडं म्हणजे प्रेशर कुकर. जवळपास अनेकांच्या किचनमध्ये एक तरी लहान-मोठा कुकर असतो. चांगल्या कुकरमुळे वेळ आणि गॅसचीही बचत होते; पण कुकर बिघडला, तर त्यात जेवणही नीट बनत नाही. अशा वेळी आपण कुकर दुरुस्तीसाठी देतो; पण तो दुरुस्त होण्यासाठी दुकानदार एक दिवसाचा वेळ घेतो. पण, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत एक दुकानदार अवघ्या काही सेकंदांत कुकर दुरुस्त करून ग्राहकाच्या हातात देतोय. त्यामुळे त्याच्या दुकानाबाहेर कुकर दुरुस्तीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळतेय. त्यामुळे झटपट कुकर दुरुस्त करणारा हा दुकानदार आता सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. त्याची कुकर दुरुस्त करण्याची टेक्निक अनेकांना चांगलीच पसंत पडत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुकर पुन्हा नव्याप्रमाणे दुरुस्त करून घेण्यासाठी ग्राहक त्याच्या दुकानाबाहेर गर्दी करुन उभे आहेत. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, दुकानदार कुकरचा प्रत्येक भाग अगदी झटपट तपासून बघतो. त्यात तो कुकरच्या कडा, त्यातील रबर रिंग, काळी शिट्टी या गोष्टी तो अगदी एखाद्या यंत्राप्रमाणे तपासून बघतो आणि अवघ्या काही सेकंदांत तो कुकर दुरुस्त करून ग्राहकाच्या हाती देतो. त्यानंतर लगेच दुसरा कुकर घेऊन तो तपसायला लागतो. अशा प्रकारे एकाच वेळी चार ते पाच कुकर दुरुस्तीसाठी त्याच्यासमोर ठेवल्याचे दिसत आहेत; तर अनेक ग्राहक दुकानाबाहेर हातात कुकर घेऊन उभे आहेत. दुकानदाराची कुकर दुरुस्तीची ही टेक्निक पाहता, अनेक ग्राहक त्याचा व्हिडीओही काढत आहेत.

वीजबिल वाचवण्यासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड; बनवला हाताने चालणारा पंखा; Video पाहून युजर्स म्हणाले, “भाऊ…”

कुकर दुरुस्तीचा हा मजेशीर व्हिडीओ @chotutufan नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर युजर्स वेगवेगळ्या भन्नाट कमेंट्स करीत आहेत. अनेकांना दुकानदाराची कुकर दुरुस्त करण्याची टेक्निक फार आवडली आहे; तर अनेकांनी नाराजी दर्शवली आहे. एका युजरने मजेशीर कमेंट करीत लिहिलेय की, डीजे कुकर. तर दुसऱ्या एका युजरने, omg हे काय सुरू आहे, असे म्हणत आश्चर्य व्यक्त केले आहे. तर काहींनी रागाच्या इमोजी शेअर करीत दुकानदाराच्या टेक्निकवर संताप व्यक्त केला आहे.