Viral video: आपल्यापैकी बऱ्याच जणांना बाहेरच्या देशात काय सुरुय, तिकडे कोणत्या गोष्टी कशा असतात याचं कुतुहल असतं. म्हणजे जसं गाव खेड्यातील लोकांना शहराचं आकर्षण असतं अगदी तसंच. शहरातले लोक काय खातात इथपासून शहरात आभाळ कसं असतं इथपर्यंतचं कुतुहल लोकांना असतं. दरम्यान आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेने कॅनडात स्वयंपाक करताना एक गोष्ट न विसरता करावीच लागते याबद्दल माहिती सांगितली आहे. आता ती नेमकी कोणती गोष्ट आहे, हे तुम्ही व्हिडीओमध्येच पाहा.
कॅनडामध्ये राहणाऱ्या एका भारतीय महिलेने एक इंटरेस्टींग माहिती दिली आहे. कॅनडामध्ये स्वयंपाक करायला सुरुवात करण्याआधी स्मोक आलार्मकडे लक्ष द्यावे लागते असं ती सांगते. आता तुम्ही म्हणाल स्मोक अलार्म म्हणजे काय? त्याचा काय उपयोग. तर कॅनडामध्ये जास्तीत जास्त घरं ही लाकडाची बनवलेली असतात. त्यामुळे संभाव्य आगीचा मोठा धोका असतो, त्यामुळे स्वयंपाक करताना आपण जेव्हा फोडणी देतो, एखादा पदार्थ तळतो किंवा असा कोणताही पदार्थ असो ज्यामुळे धूर तयार होतो. तेव्हा स्मोक आलर्म वाजतो.
कॅनडामध्ये स्वयंपाक करताना काय काळजी घ्यावी लागते
अशावेळी चिमणी वापरणं अतिशय आवश्यक आहे. हे स्मोर आलार्म म्हणजे एक प्रकारचे सेफ्टी आलार्म आहेत. दरम्यान स्मोक अलार्म काही काळाने वाजला आणि तो आपण बंद नाही केला तर अग्निशमक दल येण्याची शक्यता असते. त्यामुळे यावरही लक्ष ठेवावे लागते. जेवणच नाही तर देवपूजा करताना धूप, अगरबत्ती, दिवा लावतानाही विशेष काळजी घ्यावी लागते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> धावत्या लोकलच्या टपावर टवाळ पोरांचा जीवघेणा प्रवास; धक्कादायक VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ canada_stories_with_renuka या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरी यावर अनेक वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. तसेच कॅनडात हे कंस असतं, ते कसं असतं असे अनेक प्रश्न नेटकरी विचारत आहे. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात..सोशल मीडियामुळे देशाच्या कानाकोपऱ्यापासून इतर देशातल्याही छोट्या छोट्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहचतात. त्यातलाच हा एक व्हिडीओ..