Policeman was traveling in AC class without ticket : रेल्वे असो किंवा बस अ सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करताना काही नियम पाळावेच लागतात. रेल्वे किंवा बसने विनातिकिट प्रवास करणे हा गुन्हा आहे आणि त्यासाठी दंडही आकारला जातो. असे असतानाही अनेकदा लोक सर्रासपणे विनातिकिट एसी कोचमध्ये प्रवास करताना दिसतात. पण कायद्याचे रक्षण करणारे जर नियम मोडत असतील तर ते चुकीचे आहे.

नियम सर्वांसाठी सारखेच

नियम हे सर्वांसाठी सारखेच असतात मग तो कोणीही असो. सध्या सोशल मीडियावर असेच एक प्रकरण गाजत आहे. एक पोलिस कर्मचारी चक्क रेल्वेमध्ये विनातिकिट एसी कोचमध्ये प्रवास करत आहे पण जेव्ह टीसीने त्याला पकडले तेव्हा त्याला चांगलेच सुनावले. टीसी आणि पोलिस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

youth assaults on duty traffic police at pune
Video: एवढा माज कुठून येतो? पुण्यात वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण, व्हिडीओ व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार
Video : येरवड्यात दहशत माजविणारा गुंड प्रफुल्ल कसबेच्या साथीदारांची धिंड, पाेलिसांकडून भरचौकात साथीदारांना चोप
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”
nagpur crime news
उपराजधानीत तोतया पोलिसांचा सुळसुळाट, अजनी पोलीस ठाण्यासमोरच…
Thane , non-agricultural tax , notices, Thane citizens,
सरकारने रद्द केलेल्या अकृषिक कराच्या ठाणेकरांना नोटीसा, नोटीसांमुळे नागरिकांमधून व्यक्त होतोय संताप
bahubaliche beed loksatta article
बाहुबलीचे बीड : ‘विहिरी’तील कोट्यवधींच्या घबाडावर बाहुबली गब्बर, राखेतील परळीत ‘शांतता राखा’!

हेही वाचा – “मित्रा, जीव वाचव, परत ये”,पुराच्या पाण्यात गाडी घेऊन गेला तरुण, मित्र ओरडत राहिला पण त्याने ऐकले नाही, पाहा Viral Video

एक पोलिस कर्मचारी चक्क रेल्वेमध्ये विनातिकिट प्रवास करत आहे (सौजन्य – gktrickindia)

विना तिकीट प्रवास करणाऱ्या पोलिसाला टीसीने सुनावले

इंस्टाग्रामवर gktrickindia नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, एक पोलिस कर्मचारी विना तिकीट एसी कोचमध्ये आरामात झोपून प्रवास करताना दिसत आहे. जेव्हा एसी तिकीट आहे का विचारतो तेव्हा त्याच्याकडे तिकीट नसल्याचे समजते. त्यानंतर टीसी पोलिस कर्मचाऱ्याला चांगलेच सुनावतो. पोलिस कर्मचारी आपले तोंड लपवताना दिसतो आहे.

हेही वाचा – “काका, माफी मागा” वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये चुकून मांसाहारी जेवण देणाऱ्याला प्रवाशाने मारली कानाखाली…पाहा Viral Video

नेटकऱ्यांनी केले टीसीचे तोंडभरून कौतूक

“जनरल टीसीमध्ये येऊन झोपतोय” अशा शब्दात टीसी पोलिसाला सुनावतो आणि त्याला पुन्हा जनरल डब्यात जाऊन बसण्यास सांगतो. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. काही लोकांनी टीसीच्या कर्तव्यदक्षतेचे कौतूक केले तर काही लोकांनी पोलिस कर्मचाऱ्याला ट्रोल केले आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, “उत्तम काम केले!” दुसरा म्हणाला की, सर, तुम्हाला सलाम” तिसरा म्हणाला की, “टीसीने पहिल्यांदा काहीतरी योग्य काम केले”

Story img Loader