कामाच्या ठिकाणी कधीकधी अनेकवेळा आपल्यालाही झोप अनावर होते आणि डुलकी लागते. असे कोणाबरोबरही होऊ शकते, मग पोलीसदेखील याला अपवाद कसे ठरतील. पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याची मोठी जबाबदारी असते. त्यामुळे त्यांना पूर्णवेळ अलर्ट राहण्याची गरज असते. याचीच तयारी आणि परीक्षा ट्रेनिंग सेशनमध्ये घेतली जाते. पण याच ट्रेनिंग सेशनमध्ये जर एखाद्या भावी पोलिस अधिकाऱ्याला झोप लागली तर काय होईल? अशीच एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

उत्तरप्रदेश येथील सुलतानपूरमध्ये ट्रेनिंगदरम्यान हा किस्सा घडला आहे. इथे सुरू असणाऱ्या ट्रेनिंगदरम्यान हेड कॉन्स्टेबल राम शरीफ यादव यांना झोप लागली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी याबाबत राम यांच्याकडे नियमानुसार माफीनामा मागितला. या माफीनाम्यामध्ये याचे कारण स्पष्ट करणे अपेक्षित असते. त्यामुळे राम यादव यांनी खरे कारण लिहत हा माफीनामा दिला. त्यांच्या प्रामाणिक उत्तरामुळे सध्या हा माफीनामा प्रचंड व्हायरल होत आहे. काय लिहलंय या माफीनाम्यात पाहा.

आणखी वाचा : “दिवाळी तरी…” मुख्यमंत्री शिंदेंना चिमुकल्याने खास वऱ्हाडी भाषेत लिहिलं शेतकऱ्यांचं गाऱ्हाण मांडणारं पत्र

ट्विटरवर शेअर करण्यात आलेला माफीनामा :

राम यादव यांनी या माफीनाम्यात लिहले आहे, ‘ट्रेनिंगसाठी लखनऊवरून पीटीसी सुलतानपूरसाठी निघाल्यापासून इथे पोहचेपर्यंत खूप त्रास झाला. तसेच रात्री नीट जेवण झाले नाही त्यामुळे पोट भरले नव्हते. म्हणून सकाळी उठल्यावर २५ चपात्या, एक प्लेट भात, दोन वाटी दाळ आणि एक वाटी भाजी खाल्ली. एवढं सगळं खाल्ल्याने ट्रेनिंग दरम्यान झोप आली. पुन्हाकधी इतक जेवणार नाही’. राम कदम यांनी सांगितलेले प्रामाणिक कारण नेटकऱ्यांना आवडले असून अनेक जणांनी यावर ‘या चुकीला माफ करावे, भविष्यात नक्की अशी चूक त्यांच्याकडुन पुन्हा होणार नाही’ अशा कमेंट्स केल्या आहेत.