Social Media Viral Video: विना तिकीट प्रवास करताना पकडल्यास प्रवाशांकडून दंड आकारला जातो. अनेकदा बस, रेल्वेने विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडले जाते. कित्येकदा अशा घटनांचे व्हिडीओ देखील समोर येतात. दरम्यान सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये सामन्य प्रवासी नव्हे तर एक पोलिस कर्मचारी विना तिकिट रेल्वेने प्रवास करताना पकडला गेला आहे. एवढं नाही तर टीटीईबरोबर वाद घालतानाही दिसत आहे. टीटीईने पोलिस कर्मचाऱ्याला विना तिकिट प्रवास करताना रंगेहात पकडल्यानंतर चांगलेच खडसावले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विना तिकिट पोलिस कर्माचाऱ्याने केला प्रवास
एक्सवर (ट्विटर) “घर के कलेश”नावाच्या पेजवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोलिस कर्मचारी विना तिकि रेल्वेने प्रवास करताना दिसत आहे. त्यानंतर टीटीई त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात पण पोलिस कर्मचारी जागा सोडत नाही. थोड्या वेळाने पोलिस कर्मचाऱ्याला बाहेर काढण्याची सुचना दिली जाते. हा व्हिडीओ व्हायरल होत असून आतापर्यंत ४१ हजार पेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे. तसेच लोकांनी पोलिस कर्मचारी आपल्या पदाचा फायदा घेतल्याचा आरोप करत आहे. पोलिस कर्मचारी प्रामाणिक नाही आणि तो मुद्दा टाळण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे लोकांना राग व्यक्त केला आहे. तसेच टीटीईने पोलिस कर्मचाऱ्याला त्याची चूक सांगण्याचा प्रयत्न करत आहे.
लोकांचा राग अनावर
लोकांनी व्हिडीओ टीका केली आहे. लोकांनी पोलिस कर्मचाऱ्याच्या कृत्य चुकीचे असल्याचे सांगितले. एकाने लिहिले, “पोलिस कर्मचारी आपल्या पदाचा चुकीचा वापर करत आहे.” दुसऱ्याने लिहिले, “कुठेही जा, तिकीट घ्यावेच लागेल” तर तिसऱ्याने लिहिले की, “या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करा.आपल्या पदाचा गैरफायदा घेत आहे.”