Paris Fashion Week Unique Air bag: जगभरात बॅग्सचे अनेक फेमस ब्रॅण्ड्स आहेत; ज्यांची किंमत आणि खासियत पाहून कोणालाही नक्कीच धक्का बसेल. तुम्ही आजवर अनेक प्रकारच्या बॅग्स पाहिल्या असतील; ज्या अनेकदा चामडे वा काही खास कपड्यांपासून बनविलेल्या असतात. पण, आज आम्ही तुम्हाला आयुष्यात कधीही ऐकली नसेल किंवा पाहिली नसेल अशा बॅगबद्दल सांगणार आहोत; जी कापड, चामडे नव्हे, तर चक्क हवेपासून बनवली आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही; पण ही बॅग चक्क ९९ टक्के हवा आणि एक टक्का काचेपासून बनवली आहे. अशा अनोख्या प्रकारची ही जगातील पहिलीच बॅग आहे. त्यामुळे पॅरिस फॅशन वीकमध्ये लाँच झालेल्या या बॅगबद्दल सध्या खूपच चर्चा रंगतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बॅगची खासियत जाणून तुम्हीही व्हाल शॉक

कोपर्नी ब्रॅण्डच्या कंपनीने पॅरिस फॅशन वीकमध्ये गेल्या सोमवारी ही पर्स लाँच केली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ही पर्स बनविण्यासाठी हवा आणि काचेशिवाय इतर कोणताही गोष्ट वापरलेली नाही. ही पर्स दिसायला पूर्णपणे पारदर्शक अन् खूप हलकी आहे. या पर्सचे वजन हलक्या विजेच्या दिव्याइतकेच आहे. परंतु, मजबूतीच्या बाबतीत त्याची तुलना इतर कोणत्याही पर्सबरोबर होऊ शकत नाही. असे म्हटले जात आहे की, ही पर्स स्वतःच्या वजनापेक्षा चार हजार पट जास्त वजन उचलू शकते.

पाहा अनोख्या पर्सचा व्हिडीओ

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, या ब्रॅण्डने NASA च्या सहकार्याने ही एअर स्वाइप बॅग तयार केली आहे; जिचे वजन ३३ ग्रॅम आहे. कोपर्नी ब्रॅण्डने आपल्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर या पर्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. या खास पर्सचा उल्लेखही पोस्टमध्ये करण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही एअर स्वाइप बॅग स्पेस टेक्नॉलॉजीच्या नॅनो मटेरियलपासून बनविलेली आतापर्यंतची सर्वांत मोठी गोष्ट आहे. मात्र, ब्रॅण्डने या पर्सच्या किमतीबाबत अद्याप माहिती दिलेली नाही.