भारतात, भजी हे खाद्यप्रेमींचा आवडता पदार्थ आहे. हिवाळा असो किंवा पावसाळा, प्रत्येकाला गरमागरम भजी आणि एक कप चहा आवडतो. तुम्ही आजवर अनेक प्रकारचे भज्जी खाल्ले असतील. बटाटा, पनीर, कोबी आणि मिरची भजी पण तुम्ही कधी कोथिंबीरीचे भजी खाल्ले आहेत का? कोंथिबिरीचे भजी पूर्व भारतात आणि विशेषतः पश्चिम बंगालमध्ये खूप आवडीने खाल्ले जाता. हे खायला अगदी कुरकुरीत असतात. नुकतेच रस्त्यावरील एक विक्रेत्याचा कोथिंबीरीचे भजी बनवताना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून लोक थक्क झाले आहे.
सहसा कोथिंबिरी स्वच्छ धूवून मग व्यवस्थित निवडून वापरतात. अनेकदा विविध पदार्थांमध्ये कोथिंबिरी चिरून वापरतात. कोथिंबिरीच्या वड्या करतानाही कोथिंबीर चिरून घेतात पण कोथिंबिरीची संपूर्ण कुडी कधीही वापरताना तुम्ही पाहिली नसेल.,व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्तीच्या हातात कोथिबिरीची गड्डी दिसत आहे.त्याची मुळं कापलेली दितल आहे. हा व्यक्ती दोन तीन कोथिंबिरीच्या कुड्या एकत्र पकडून थेट बेसनात बूडवतो आणि गरम तेला टाकतो. दोन्ही बाजूने भाजून घेऊन तो सोनेरी रंग येईलपर्यंत तळतो. गरमा गरम कोथिंबिरीची भजी तयार होतात..
हेही वाचा – कोणी म्हणे ‘ Scorpito’ तर कोणी ‘Scoriksha’: व्यक्तीने जुगाड करून रिक्षाची बनवली स्कॉर्पिओ; पाहा Viral Video
व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आवडीने भजी खाणारे लोक हा व्हिडीओ पाहून लोकांच्या मनात स्वच्छतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषत: हे भजी ज्या तेलात तळले आहे याबाबतही लोकांना शंका निर्माण झाली आहे. एकाने कमेंट करत म्हटले की, ठब्रिटनवरून भारतात आलो तरीही हे तेल कधीही बदलले नाही.”
हेही वाचा – World Cup 2023 : भारताच्या परभवानंतर ढसा ढसा रडली चिमुकली, Viral Video पाहून नेटकऱ्यांना अश्रू झाले अनावर
दुसर्याने लिहिले,”तेल बदलण्याची वेळ आली आहे.”
एका कमेंटमध्ये लिहिले होते, “भाऊ, तुम्ही किमान कोथिंबीर तरी धुवून घ्यायला हवी होती.”