करोनाची शोकांतिका संपल्याचं दिसताच त्यातला एक नवा व्हेरीएंट समोर येतो. मात्र, हे टाळण्यासाठी जगभरात बूस्टर डोसचा सल्ला दिला जात आहे. अलीकडे, एका जर्मन माणसाने करोना बूस्टर लसीचे सुमारे ९० शॉट् घेतल्याचे प्रकार समोर आला आहे. मात्र हीच व्यक्ती पुन्हा सेंटरमध्ये ९१व्या शॉटसाठी उपस्थित असताना तेथील पोलिसांकडून पकडण्यात आले आहे .
या व्यक्तीचे वय ६० वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान त्या व्यक्तीची ना ओळख उघडकीस आली आहे, ना हे सांगितले जात आहे की करोना लसीच्या सुपर ओव्हरडोसचा त्या व्यक्तीच्या तब्येतीवर काय परिणाम झाला आहे? जर्मनीतील सॅक्सनी येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीला एडिनबरा येथे लसीकरण करताना पकडण्यात आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
डेली मेलच्या वृत्तानुसार, वृद्ध व्यक्तीला ९० वेळा करोनाची लस देण्यात आली होती, जेणेकरून तो लसीची बनावट प्रमाणपत्रे गोळा करून लोकांना विकू शकेल. सर्टिफिकेटवर मूळ लसीचा बॅच नंबर होता आणि ज्यांना स्वतः लस घ्यायची नव्हती अशा लोकांना तो ती विकत असे. पोलिसांनी वृद्धाला अटक केल्यानंतर त्याला लसीकरण कार्ड अधिकृततेशिवाय कसे देण्यात आले आणि कागदपत्रांमध्ये कशी फसवणूक करण्यात आली, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. जर्मनीतील अनेक लोकं कोविड लसीला विरोध करतात आणि लस घेत नाही. परंतु प्रमाणपत्रांसाठी अशा पद्धती युक्त्या वापरतात.
असे नाही की पहिल्यांदाच एखाद्याने करोना लसीचा ओव्हरडोज घेतला आहे, पण हो, ९० डोस घेणारा तो पहिलाच व्यक्ती आहे, ज्याचा आरोग्यावर काय परिणाम झाला हे माहीत नाही. यापूर्वी न्यूझीलंडमध्येही २४ तासांच्या आत एका व्यक्तीला कोविड-१९ चा डोस मिळाला होता. त्याच वेळी, आपल्या देशाच्या बिहार राज्यात, एका ८४ वर्षीय व्यक्तीने करोना लसीचे ११ डोस दिले होते.