करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक देशांनी आता मोठी पावलं उलण्यास सुरूवात केली आहे. जगाभरातील अनेक देशांनी करोनापासून वाचण्यासाठी निरनिराळे निर्णयही घेतले आहेत. पण आता इटलीच्या सरकारनंही नवा आदेश जारी केला आहे. सरकारनं आपल्या देशातील नागरिकांना एकमेकांना किस न करण्याचे आदेश दिले आहेत. याव्यतिरिक्त हस्तांदोलन करण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय इटलीच्या सरकारनं घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इटली सरकारव्यतिरिक्त फ्रान्स सरकारनंही आपल्या देशातील नागरिकांना गालावर किस न करण्याच्या सुचना दिल्या आहेत. फ्रान्सचे आरोग्यमंत्री ऑलिव्हिअर वेअर यांनी यासंदर्भातील सुचना दिल्या आहेत. हे निर्बंध तात्पुरत्या कालावधीसाठी असल्याचंही त्यांनी सांगितलं. फ्रान्समध्ये एकमेकांना भेटल्यावर गालावर किस करण्याची प्रथा आहे. परंतु करोनामुळे सरकारनं खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर इटलीमध्ये सर्व फुटबॉल मॅच रद्द करण्यात आल्या आहे. तर म्युझिक कॉन्सर्टही अनिश्चित कालावधीसाठी रद्द करण्यात आले आहेत. सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यावरही सरकार विचार करत असल्याची माहिती इटलीच्या शिक्षण मंत्री ल्युसिया एंजोलिना यांनी सांगितलं. आतापर्यंत करोनामुळे जगभरात ३ हजारांपेक्षा अधिक लोकांचे प्राण गेले आहेत. तर ९५ हजारांपेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.