करोनाचा पार्दुर्भाव रोखण्यासाठी देशामध्ये २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २४ मार्च रोजी ही घोषणा केली आहे. या घोषणेला आज (३१ मार्च रोजी) सात दिवस पूर्ण झाले आहेत. अजून दोन आठवडे देशामधील लॉकडाउन सुरु राहणार आहेत. या काळामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कंपन्या तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहणार आहेत. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याची मुभा दिली आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन परीक्षा पुढील सुचना मिळेपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आता अनेकजण घरीच होम क्वारंटाइन आहेत. अनेकांना या सक्तीच्या रजेमध्ये काय करावं हे सुचनेसं झालयं आहे. त्यामुळेच आता एक नवीन ट्रेण्ड फेसबुकवर पहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

होम क्वारंटाइन असणाऱ्या अनेकांनी सोशल नेटवर्किंग साईट्सचा आणि वेब सिरीजचा आधार घेतला आहे. मात्र मागील सहा दिवसांमध्ये अनेकांच्या अनेक आवडत्या वेबसिरीज पाहून झाल्या आहेत. घरातून बाहेर पडणं शक्य नसल्याने आता अनेकांनी आपल्या मोर्चा टीकटॉकवरुन फेसबुकवर वळवला आहे. मिम्स शेअर करुनही कंटाळा आल्याने आता अनेकांनी आपल्या मित्र-मैत्रिणींनाच टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे.

काय आहे हा ट्रेण्ड

मागील दोन दिवसांपासून फेसबुकवर एक ट्रेण्ड दिसून येत आहे. यामध्ये एकाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीचा काही वर्षांपूर्वीचा फोटो शोधून त्यावर यमक जुळवणाऱ्या भन्नाट कमेंट केल्या जात आहेत. भारतामध्ये फेसबुक मोठ्या प्रमाणत वापरण्यास सुरुवात होऊन दहा वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळेच अगदी पाच वर्षांपासून ते आठ ते दहा वर्षांपूर्वीचे फोटो शोधून शोधून त्यावर अनेकजण कमेंट करत आहेत. त्यामुळे अनेकांचे जुने फोटो आता टाइमलाइनवर अचानक झळकू लागले आहेत. अचानक हे फोटो चर्चेत आल्याने ज्या मित्राला किंवा मैत्रिणींना टार्गेट केलं जात आहे ते लोकं हे फोटो डिलीट करत आहेत किंवा कमेंट डिसएबल करत आहेत. काहीजण या शेरेजाबीची मज्जा घेताना दिसत आहेत.

काही व्हायरल झालेल्या कमेंट खालीलप्रमाणे…

मुलांच्या फोटोंवर येणाऱ्या कमेंट…

महानगर पालिका बोलते रस्त्यावर नका थुंकू
भाऊ आमचे लाखो मुलींच्या माथ्याच़ कुंकू

ती बोलली हृदय दे ना..
भाऊ बोल्ले तू उद्या ये ना..!

भाऊचा फोटो बघून चीन पण म्हणलं मला मजबूत हाणा
पण पहिलं सांगा कोण आहे हा कवळा दाणा?

पाळण्यात बसून घेत होतो झोका..
भाऊचा फोटो पाहून मैत्रिणीने दिला प्रियकराला धोका

शिकाल तर टिकाल….
आणि भाऊच्या नादाला लागले तर स्टेशनला बरमूडे विकाल…

अचानक गेली लाईट आणि उडाला घरातला फ्युज
सगळ्या पोरी बोलतात आला ग बाई माझा टॉम क्रुझ

अरे कुठं तो शाहरुख??
अन कोण तो सल्लू??
आमचा भाऊ दिसला कि पोरी म्हणतात आलं माझं पिल्लू

पेरु आणला घरी, पण नव्हता आमच्याकडे चाकू….
सगळ्या मुली बोलतात, हाच आमच्या दिलाचा डाकू

भाऊनी फोटो टाकल्यावर…
मार्केट मंद आणि धंदा बंद
सगळ्याच जणी म्हणतात…
आला गं माझा देवानंद

आंघोळ करताना अस वाटत साबण किती रगडू,
आणि आमच्या भाऊला पाहून पोरी म्हणतात
मीच याची प्राजु आणि हाच माझा दगडू

थंड तेलात भजी काही तळेना,
भाऊपेक्षा हॅण्डसम पोरींना कोणी मिळेना

महाराष्ट्रात येतात परप्रांतियांचे लोंढे,
महाराष्ट्रात येतात परप्रांतीयांचे लोंढे..
भाऊंना बघून पोरी म्हणतात
मी याची कुक्कु हाच माझा गणेस गायतोंडे

माथे पे बिंदिया नैनो मे काजल
लडकिया बोली यही बनेगा मेरे वासेपूर का फैजल !!!

कासवाच्या शर्यतीत मागे टाकले सश्याला
इतक्या सुंदर चेहऱ्यावर फेअर अँण्ड लव्हली कश्याला..

मक्याचे कणीस चुलींवर भाजले
भाऊचा फोटो पाहुन सौंदर्य ही लाजले

चावला होता मच्छर आली याला खाज,
खरं खरं सांगा क्या हे आपले खूबसुरती का राज

गावरान अंडी तळली तुपात…!!!
काही तरी जादू आहे भाऊ च्या रुपात….!!!!

सगळ्यात कडू कार्ले
तू तर फोटो टाकून जिवंत मारले

लगानमधला आमिर आणि शोले मधला गब्बर
फोटो पाहून भाऊंचा, पोरी म्हणतात
मी याची शीसपेन्सिल ह्यो माझा खोडरब्बर

आमचे भाऊंच्या घरात मार्बलची फरशी
सगळ्या पोरी म्हणतात होणार सून मी या घरची

मुन्नी ने लावला झण्डू बाम,
भाऊ दिसतो गुलाबजाम

मुलींच्या फोटोवर येणाऱ्या कमेंट…

ताईंची आहे कडक अदा
खूप आहेत पोरं त्यांच्यावर फिदा

दोन दगडांना भेदून टाकेल अशी तीक्ष्ण ताईंची जॉ लाईन…
सगळे पोरं म्हणतात “शी इज ओन्ली माईन…

तुमच्या घरी दाखवायचे तुमचे लटके झटके,
आता ताईंचा नाद केल्यावर डायरेक्ट पोकळ बांबुंचे फटके

ताईंचे ब्रेकफास्ट चे आहे लाखो रुपये बिल
आपल्या स्माईल ने चोरतात पोरांचे दिल….

चहासोबत छान लागते खारी
आमची ताई लय भारी

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus funny comments on old photos is new trend on facebook as maximum people goes in home quarantine scsg