करोनाच्या फैलावामुळे सध्या जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. करोनाचा क्रीडा क्षेत्रालाही फटका बसला असून सर्व क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. सुरू असलेल्या काही क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत.
भारताची देशांतर्गत आघाडीची टी २० स्पर्धा IPL देखील अद्याप सुरू झालेली नाही. देशभरात लॉकडाउन असल्याने IPL जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे परदेशी खेळाडू देखील आपापल्या घरी विसावले आहेत. अनेक क्रीडापटू आणि क्रिकेटपटू करोनाग्रस्तांना विविध प्रकारे मदत करत आहेत.
या संकटकाळात वेस्ट इंडीजच्या अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो याने जगातील सर्व लोकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आपले नवीन गाणे ‘नॉट गिव्हिंग अप’ लॉन्च केले आहे. जगभरातील सर्व प्रकारचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. त्याच्या नवीन गाण्यात ब्राव्होने सध्याची परिस्थिती किती वाईट आहे ते सांगितले आहे.
View this post on Instagram