भारतामधील करोना परिस्थिती दिवसोंदिवस गंभीर होत चालल्याचे चित्र दिसत आहे. करोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून सलग दुसऱ्या दिवशी २४ तासांत आणखी ३.३२ लाख जणांना करोनाची लागण झाली. हा एका दिवसातील उच्चांक असून त्यामुळे बाधितांची एकूण संख्या एक कोटी ६२ लाख ६३ हजार ६९५ वर पोहोचली आहे. तर उपचाराधीन रुग्णांच्या संख्येने २४ लाखांचा टप्पा ओलांडला असून एका दिवसात आणखी २२६३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, असे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. भारतातील करोनाची परिस्थिती पाहून भारताचा शेजरी असणाऱ्या पाकिस्तानमधून आता भारतासाठी आणि भारतीयांसाठी प्रार्थना केल्या जात आहेत. शुक्रवारी रात्रापासून सोशल नेटवर्किंगवर खास करुन पाकिस्तानमधील सोशल नेटवर्किंग ट्रेण्डमध्ये #PakistanstandswithIndia म्हणेच पाकिस्तान भारतासोबत उभा आहे असं सांगणारा ट्रेण्ड टॉप ट्रेण्ड ठरला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा