Corruption Viral Video : सरकारी कामात होत असलेला भ्रष्टाचार आपल्या देशात काही नवीन नाही. आजवर अशा अनेक घटनाही समोर आल्यात. सरकारी कामातील अशाच एका भ्रष्टाचाराच्या घटनेचं उत्तम उदाहरण प्रत्यक्षात दाखविणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका तरुणाने ही सरकारी खात्यातील भ्रष्टाचाराची घटना उघडकीस आणली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सरकारी कामातील भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबद्दल संताप व्यक्त केला आहे.

तुम्ही गावाकडे पाहिलं असेल की, सरकारकडून रस्ता बांधण्याचे काम हाती घेण्यात येते. यावेळी रस्ता बांधणारे कंत्राटदार मात्र एका दिवसात रस्त्याच्या नावाखाली थुकपट्टी लावून निघून जातात. व्हायरल व्हिडीओतही तेच घडलं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण नुकताच बांधलेला रस्ता दोन हातांनी उखडून काढताना दिसतोय. रस्त्यासाठी वापरलेल्या डांबर आणि खडीचा थर इतका कमकुवत आहे की, फक्त हातांनी उखडल्यानंतरही तो सहज निघतोय. त्यातून तो तरुण कंत्राटदाराने रस्ता बांधण्यासाठी किती निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले हे सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडीओ नेमका कोणत्या राज्यातील आहे याबाबतची माहिती समोर आलेली नाही. पण, यातून रस्त्यांच्या बांधकामात कशा प्रकारे भ्रष्टाचार होतो हे मात्र पुरेपूर उघड झाले आहे. अनेकांनी या व्हिडीओसंदर्भात तीव्र संताप व्यक्त केला आहे.

“रस्त्याचे कंत्राटदार सचिन टिचकुले” युजर्सच्या कमेंट्स

हा व्हायरल व्हिडीओ @theindiansarcas नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “काय रोड आहे भावा”. दरम्यान, आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आणि हजारो लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, “रस्त्याचे कंत्राटदार सचिन टिचकुले”. दुसऱ्याने लिहिलेय की, “यावरून सरकारी कामात कशा प्रकारे भ्रष्टाचार होते हे दिसून येते”. तिसऱ्या एकाने लिहिलेय की, “रस्ता नाही हे डांबराचे कार्पेट आहे”.