Cotton Candy Banned: रंगीबेरंगी कॉटन कँडी बहुतेक मुलांमध्ये आवडते. तोडांत टाकता विघरळणारी कॉटन कँडी विकण्यावर पुद्दुचेरीमध्ये बंदी घालण्यात आली आहे .सर्वांना आवडणारी ही कॉटन कँडी आता या राज्यात मिळणार नाही. पण ही बंदी का घालण्यात आली आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सरकारी अधिकाऱ्यांना कॉटन कँडीच्या निर्मितीमध्ये विषारी रसायनांचा वापर आढळून आला आहे. पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर तमिलसाई सौंदर्यराजन यांनी गुरुवारी एका व्हिडिओमध्ये बंदीची घोषणा केली. त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर क्लिप शेअर करून, राज्यपालांनी जनतेला मुलांसाठी कॉटन कँडी खरेदी करु नये असे करण्याचे आवाहन केले कारण त्यातील रसायने संपूर्ण शरीराला हानी पोहोचवतात.

व्हिडिओमध्ये, तमिलसाई सौंदर्यराजन यांनी खुलासा केला की, “अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना रोडामाइन-बी हा विषारी पदार्थ आढळला आहे.” राज्यपालांनी आवाहन करताना सांगितले की, “पुद्दुचेरीतील मुले आणि इतर लोक वापरत असलेल्या कॉटन कँडीमध्ये ‘रोडामाइन बी’ नावाचा विषारी पदार्थ वापरला जात असल्याचे आढळून आले आहे.”

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे

हेही वाचा – शुभ्र बर्फातून धावणारी रेल्वे! भारतीय रेल्वेने शेअर केले मनमोहक दृश्य; डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या व्हिडीओची चर्चा

व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “मुलांसाठी रासायनिक कॉटन कँडी विकत घेऊ नका ज्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो…”

दरम्यान, पुद्दुचेरीच्या अधिकाऱ्यांना कॉटन कँडी विकणाऱ्या दुकानांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कॉटन कँडीच्या नमुन्यांमध्ये विषारी पदार्थ आढळल्यास दुकान जप्त करण्यात येईल, असे राज्यपाल म्हणाले.

अलीकडेच चेन्नईतील अधिकाऱ्यांना कॉटन कँडीच्या नमुन्यांमध्ये सिंथेटिक रंगही सापडले. आरोग्य अधिकाऱ्यांनी स्प्रिंग पोटॅटो, तळलेले मासे आणि भज्जी यासह इतर स्नॅक्समधील रंगांबद्दल चेतावणी दिली होती.

हेही वाचा – जेव्हा नागालँडचे मंत्री तलावात उतरतात तेव्हा..; स्वत:चा मजेशीर व्हिडीओ शेअर करत म्हणाले, “आज JCB

Rhodamine-B म्हणजे काय?

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ (NIH.gov) नुसार, रोडामाइन बी हे सहसा आरएचबी म्हणून संक्षिप्त केले जाते आणि ते एक रासायनिक संयुग आहे जे रंग म्हणून कार्य करते. अन्नामध्ये मिसळल्यावर ते अनेकदा शरीरात प्रवेश करते आणि पेशी आणि ऊतींवर ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण करते. इतकंच नाही तर रोडामाइन बीचा दीर्घकाळ वापर केल्यास यकृत आणि कर्करोगासारख्या समस्या उद्भवू शकतात.Rhodamine-B मुळे मळमळ, उलट्या, अतिसार, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मूत्रपिंडाचे आजार, यकृताचे कार्य बिघडणे, हार्मोनल असंतुलन, अकाली जन्म (premature birth), प्रतिकारशक्ती कमी होणे, मज्जासंस्थेचा विकास विकार(nervous system development disorders), मानसिक आरोग्य समस्या, आणि शिकण्यात अक्षमता/संज्ञानात्मक कार्य बिघडणे (cognitive dysfunction) अशा विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. .

Story img Loader