तुमच्या आयुष्यात कधी वाईट दिवस आले आणि त्यामुळे तुमची निराशा होत असेल, हरल्यासारखं वाटू लागत असेल तर तुम्ही कदाचित हा व्हायरल व्हिडीओच पाहिला नसणार. कारण हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर या व्यक्तीपुढे आपलं दुःख छोटं वाटू लागतं. जगात असे भरपूर व्यक्ती आहेत जे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करत जीवन जगत आहेत. मग आपण तर सहजच अशा हजारो अडचणींना तोंड देऊ शकतो, नाही का? हेच दर्शवणारा हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती रस्त्यावर उभा राहून  ‘बुढिया के बाल’ म्हणजे कॉटन कँडी विकण्यासाठी उभा आहे. कॉटन कॅंडी लटकवलेला दांडूका हातात घेऊन तो उभा असताना अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू तरळत असल्याचे दिसून आले. तो त्याच्या अश्रूंना आवर घालत होता, पण अखेर त्याच्या भावनांचा बांध तुटतो आणि आपल्याच हाताने आपले अश्रू पुसतो. त्यानंतर तो त्याच्या हातातल्या कॉटन कॅंडीकडे एकटक पाहतो आणि पुन्हा आपल्या भावनांवर आवर घालण्याचा प्रयत्न करतो. या व्यक्तीच्या अश्रूमागे काय कारण असेल, हे सांगणं थोडं अवघडच आहे. पण तरी सुद्धा हा व्हिडीओ पाहून साऱ्यांचेच डोळे पाणावतात. 

आणखी वाचा : रंग बदलणारा पक्षी कधी पाहिलाय का? मग हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

प्रत्येकाला भावूक करणारा हा व्हिडीओ छायाचित्रकार आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर आसिफ खान यांनी theotherelement नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शन देखील लिहिण्यात आलीय. “फक्त संघर्ष लोकांना दिसत नाही, याचा अर्थ असा नाही की ते आतून दुःखी नाहीत.”, असं लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना यावर आपल्या प्रतिक्रिया शेअर करण्याचा मोह आवरता येत नाही. हजारो युजर्सनी या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलाचे गाल ओढत, डोळ्यात फुंकर घालत महिलेने गरीब-श्रीमंतीतला भेदही संपवला

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : एक-दोन नव्हे तर तब्बल ४० भुकेल्या मगरींनी सिंहिणीला घेरलं, मेलेल्या पाणघोड्याच्या मदतीने केली सुटका!

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओला आतापर्यंत ८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहत असून या व्यक्तीच्या रडण्यामागचं कारण काय असेल, याचा अंदाज लावताना दिसून येत आहेत. काही युजर्सनी कमेंट करताना लिहिले की, या व्यक्तीला पैशाची गरज असेल पण त्याचे कॉटन कॅंडी विक्रीला जात नसतील, त्यामुळे निराश होऊन तो रडला असावा. तर काही युजर्सनी तो दुःखी असूनही पोटापाण्यासाठी कॉटन कॅंडी विकतोय आणि यात त्याचा त्याचं दुःख आवरता आलं नसेल म्हणून तो रडला असावा, असं देखील काही युजर्स म्हणत आहेत. 