आपल्याला भारताची राजधानी किंवा अजून कोणत्याही देशाची राजधानी विचारली तर आपण पटकन एक उत्तर देऊ. आपल्याला लहानपणापासन देशाची राजधानी एकच असते असे शिकवलेले असते. त्यामुळे उत्तर चुकीचं किंवा बरोबर आलं तरी उत्तर आपण एकच देणार. पण, या जगात असेही काही देश आहेत ज्याच्या एक नाही तर दोन राजधानी आहेत. चला तर मग, दोन राजधान्या असलेले नक्की तकोणते देश आहेत ते वाचू…
चिलीः चिली देशाच्या दोन राजधानी आहेत. एक आहे ती सैंटिएगो अधिकृत राजधानी आहे तर वालपारएजो ही दुसरी राजधानी आहे जिथे नॅशनल काँग्रेस बसते.
जॉर्जियाः सरकारी कामकाजांचे विभाजन करण्यासाठी जॉर्जियाच्याही दोन राजधान्या आहेत. तबिलसी ही अधिकृत राजधानी आहे तर कुतैसी ही कार्यपालिकेचं केंद्र आहे.
श्रीलंकाः या देशाचं नाव बघून कदाचित आश्चर्य वाटेल. या देशाची राजधानी कोलंबो आहे हे तर सगळ्यांनाच माहित होतं. पण, या देशाची दुसरी राजधानी श्री जयवर्धनपुरा ही आहे. १९८२ मध्ये श्रीलंकेचं संसद कोलंबोमधून, श्री जयवर्धनपुराला हलवण्यात आले होते.
हॉन्डुरसः १९८० मध्ये तेगुचिगालपाला हॉन्डुरसची राजधानी बनवण्यात आले होते. पण, १९८२ मध्ये संविधानामध्ये काही बदल झाले आणि कोमायाग्युएला या राज्यालाही राजधानीचा दर्जा मिळाला.
बोलिवियाः बोलिवियामध्ये क्रांती झाल्यानंतर ला पाझ इथून सरकारी काम होत आहेत. पण. अधिकृत राजधानी सुक्रे आहे.
नेदरलॅण्डः १८१४ पासून अॅमस्टरडॅम ही नेदरलॅण्डची राजधानी आहे. पण असे असले तरी सरकारी कामं ही द हेग इथूनच केली जातात.
आइवरी कोस्टः १९३३ पासून अबिजान ही या आफ्रिकी देशाची राजधानी आहे. पण. १९६० ते १९९३ पर्यंत देशाचे राष्ट्रपती फेलिक्स होफोएट- बायोजनी यांनी आपले गाव यामुशोकरो याला दुसरी राजधानी बनवली.
मलेशियाः मलेशियाची पहिली राजधानी क्वालालंपुर ही आहे. पण या शहरात अधिक गर्दी होत गेली. त्यामुळे इथे सरकारी कामकाज करमे कठीण व्हायला लागले. म्हणून १९९५ मध्ये सरकारी कामकाजासाठी नवे शहर बनवले गेले. १९९९ पासून सरकारी कामकाजांसाठी पुत्राज्या ही दुसरी राजधानी आहे.
बेनिनः पश्चिम आफ्रिकी देश बेनिनच्याही दोन राजधानी आहेत. पोर्ट- नोवो ही अधिकृत राजधानी आहेत. पण सरकारी कामे मात्र कोटोनोऊ इथून होत असतात.
मोंटेनेग्रोः इथली अधिकृत राजधानी पोडगॉर्सिया ही आहे. इथूनच अधिकतर कामे होत असतात. पण सेटिन्ये या शहरालाही दुसरी ऐतिहासिक राजधानी बनवण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकाः १९१० मध्ये या देशाचे एकीकरण झाले होते. यात अनेक राज्यांचा समावेश करण्यात आला होता. पण राजधानीसाठी कोणतं शहर निवडावं यावर मात्र एकमत झाले नव्हते. म्हणून केप टाऊन, ऑरेंज रिवर आणि ट्रांसवाल या तीन शहरांना राजधानींची मान्यता देण्यात आली.
…या देशांच्या आहेत चक्क दोन राजधानी
या जगात असेही काही देश आहेत ज्याच्या एक नाही तर दोन राजधानी आहेत
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 18-08-2016 at 20:13 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Countries have two or more capital cities