पहिलं वर्ष संपत नाही तर पुढच्या वर्षी कोणकोणत्या सुट्ट्या आहेत हे कॅलेण्डरमध्ये आपण बघतो. कधी कुठली शनिवार रविवारला लागून सुट्टी येत आहे का ते तर आधीच पाहतो. यात तर सरकारी सुट्ट्या किती आणि त्याला जोडून आपण किती सुट्ट्या घेऊ शकतो याचा आराखडा बांधतो.
आपल्याकडे खाजगी कंपन्यांना सगळ्याच सरकारी सुट्ट्या मिळतात असे नाही. आपल्याकडे ज्या सरकारी सुट्ट्या मिळतात, त्याबद्दल काहींमध्ये नाराजी आहे तर काहींना त्या वाढवून हव्या आहेत पण इतर देशांच्या तुलनेत आपल्यालाच सगळ्यात जास्त सराकरी सुट्ट्या मिळतात हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग कोणत्या देशात किती सरकारी सुट्ट्या आहेत ते पाहू…
जपानः जपानमध्ये संपूर्ण वर्षात एकूण १५ सरकारी सुट्ट्या असतात. यात जपानची स्थापना झाली तो दिवस, बालदिन आणि सेवा दिवस यांसारख्या सुट्ट्यांचा समावेश असतो.
अर्जेंटिनाः अर्जेंटिनामध्येही वर्षात १५ दिवस सरकारी सुट्ट्या असतात. इथे १ मे, स्वातंत्रता दिवस, राष्ट्रीय ध्वज दिवस यांसारख्या सुट्ट्या असतात.
पाकिस्तानः पाकिस्तानमध्ये एकूण १६ दिवसांच्या सरकारी सुट्ट्या असतात. आपला शेजारीर देशात इकर कोणत्याही सुट्ट्यांपेक्षा धार्मिक सुट्ट्या जास्त असतात.
तुर्कीः तुर्कीमध्येही लोकांना वर्षांतून १६ सरकारी सुट्ट्या असतात. ज्यातल्या अधिकतर या धार्मिक सणांसाठीच दिल्या जातात.
थायलंडः थायलंड हा पर्यटनाचा देश मानला जातो. इथले आर्थिक उत्पन्न हे अधिकतर पर्यटनावरच अवलंबून असतं. पण या देशातही १६ सरकारी सुट्ट्या दिल्या जातात. ज्यात नवीन वर्षची एक तर माघ पूजा आणि कामगार दिनचीही सुट्टी असते.
चीनः भारताचा अजून एक शेजारील देश, चीनमध्ये मात्र वर्षाला १७ सुट्ट्या दिल्या जातात.
हाँगकाँगः हाँगकाँगमध्येही १७ सरकारी सुट्ट्या मिळतात. ज्यात नवीन वर्ष, बुद्ध जयंती आणि स्थानिक नवीन वर्ष या मुख्य सुट्ट्या आहेत.
कोलंबियाः कोलंबियामध्ये एकूण १८ सरकारी सुट्ट्या आहेत. त्यातल्या १२ सुट्ट्या तर धार्मिक सुट्ट्या आहेत. नवीन वर्षाची सुट्टीही ठरलेली असतेच.
फिलीपीन्सः सरकारी सुट्ट्यांच्या या शर्यतीत कोलंबिया आणि फिलीपीन्स हे समसमान आहेत. इथे १८ सरकारी सुट्ट्या असतात.
भारतः सध्या तरी सरकारी सुट्ट्यांच्या बाबतीत का होईना या शर्यतीत भारतच पहिला आहे. भारतात एकूण २१ सरकारी सुट्ट्या मिळतात. सर्व धर्म मानणाऱ्या आपल्या देशात प्रत्येक धर्माच्या सणाला तेवढेच महत्त्व दिले जाते. त्यामुळए ईद असो किंवा दिवाळी, गणपती असो किंवा नाताळ इथे प्रत्येक धर्माच्या महत्त्वपूर्ण सणांना सुट्टी दिली जाते. शिवाय कामगार दिन, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्रता दिन हेही महत्त्वपूर्ण दिवस आहेतच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा