ब्रिटनच्या ल्युटनहून इबीझाला जाणाऱ्या इझीजेटच्या (easyJet) विमानात एक विचित्र प्रकार घडला आहे. या विमानातील शौचालयात एका जोडप्याला लैंगिक संबंध ठेवताना रंगेहाथ पकडलं आहे. या प्रकारानंतर संबंधित जोडप्याला विमानातून उतरवण्यात आलं. विमानातील एका प्रवाशाने संबंधित सर्व प्रकार आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
‘द इंडिपेंडंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित जोडपं विमानाच्या वॉशरुममध्ये लैंगिक संबंध ठेवत होतं. यावेळी विमानातील एका कर्मचाऱ्याने वॉशरुमचा दरवाजा उघडला. यानंतर संबंधित सर्व प्रकार उघडकीस आला. ८ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेची ३७ सेकंदाची एक व्हिडीओ क्लिप ‘एक्स’वर (ट्विटर) व्हायरल झाली आहे.
हेही वाचा- विद्यार्थिनीला कॅफेत बोलावून केलं अश्लील कृत्य; गटाने शिक्षकाला विवस्त्र करत दिला चोप
विमानातील वॉशरुममध्ये सुरू असलेला प्रकार लक्षात आल्यानंतर, एका कर्मचाऱ्याने वॉशरुमचा दरवाजा उघडला. यावेळी संबंधित जोडपं अवघडलेल्या स्थितीत आढळून आलं. हा प्रकार पाहिल्यानंतर विमानातील इतर प्रवाशांना हसू आवरता आलं नाही. तर काही जणांनी आरडाओरड केली.
हेही वाचा- धावत्या बसमध्ये कंडक्टरचा प्रवासी तरुणीबरोबर सेक्स, गैरवर्तनाचा VIDEO व्हायरल
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर EasyJet च्या प्रवक्त्याने या घटनेची पुष्टी केली. ८ सप्टेंबर विमानात घडलेल्या या प्रकारामुळे संबंधित जोडप्याला विमानातून उतरवल्याची माहिती प्रवक्त्याने दिली.