कॉलेजचे दिवस सगळ्यांच्याच आठवणीत असतात. या आठवणी आपण कायम जपून ठेवतो. कॉलेजमध्ये झालेली मैत्री, बंक केलेले क्लास, कॉलेजची गॅदरिंग या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे आपल्या आठवणीत राहिलेल्या असतात.

सोशल मीडियावर अनेकदा कॉलेजच्या तरुणांचे असे अनेक व्हिडीओ व्हायरलही होत असतात, जे पाहून आपल्याला आपले कॉलेजचे दिवस आठवतात. सध्या असाच कॉलेजमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. त्यात एका तरुण आणि तरुणीने जबरदस्त डान्स केला आहे.

रोमॅंटिक डान्स व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या कॉलेजमधल्या दिवसांची आठवण येईल. व्हिडीओमध्ये एका कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये एक तरुणी डान्स करताना दिसतेय. शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ या बॉलीवूड चित्रपटातील गाण्यावर तरुणी थिरकत असते. हा कपल डान्स असल्यानं काही वेळानं या गाण्यात एका तरुणाचीदेखील एन्ट्री होणार असते. पण व्हिडीओमध्ये दाखविल्याप्रमाणे तरुण डान्स फ्लोअरवर जायला थोडा घाबरत असतो, तो डान्स करायला नकारही देतो; पण त्याचे मित्र त्याला प्रोत्साहित करतात आणि डान्स करण्यासाठी पाठवतात.

डान्स फ्लोअरवर गेल्यावर दोघं जण अगदी बेभान होऊन डान्स करू लागतात. टाळ्यांचा कडकडाट ही त्यांच्या डान्सची जणू पोचपावतीच असते. सोशल मीडियावर सध्या यो दोघांचा रोमँटिक डान्स चर्चेत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @sarcaxmic या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला ‘प्रत्येकाला अशा मित्रांची आणि डान्स पार्टनरची गरज असते’, अशी कॅप्शन देण्यात आली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल ३.८ मिलियन व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करत लिहिलं, “मुलीला स्पर्श न करता त्याने ज्या प्रकारे डान्स केला आहे ना, अगदी”. दुसऱ्यानं कमेंट करत लिहिलं, “आजपर्यंत पाहिलेला सर्वांत सुंदर डान्स.” तर तिसऱ्यानं, “अगदी ९० च्या काळातला डान्स वाटला, खूप छान”, अशी कमेंट केली.

Story img Loader