Viral video: गेल्या काही दिवसांपासून रोमँटिक जोडपी रस्त्यावर धोकादायक पद्धतीने स्टंट करतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. देशातील अनेक भागातून असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. दिवसेंदिवस सोशल मीडियाचं क्रेझ वाढत आहे. लोक प्रसिद्धीसाठी काहीही करताना दिसतात. आपला जीवही धोक्यात घालायला कमी करत नाही. यामध्ये लहानापांसून मोठ्यांपर्यंत सर्वच सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एक कपल विहिरीच्या मधोमध स्टंट करत आहे. यामध्ये थोडा जरी पाय घसरला तरी ते थेट विहिरीत पडू शकतात. हे इतकं भयानक आहे की बघूनत अंगावर काटा येतो. जगात लोक प्रसिद्धीसाठी काहीही करु शकतात.अगदी मृत्यूच्या दारातही जाऊ शकता हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कपल विहिरीच्या मधोमध एका खाटेवर उभे आहेत. विहिरीच्या दोन्ही बाजुला ही खाट बांधली आहे. आणि यावर हे कपल डान्स करताना दिसत आहे. तुम्ही व्हिडीओत पाहू शकता, हे किती धोकादायक आहे. यामध्ये महिलेने चक्क साडी नेसली आहे आणि ती स्टंटबाजी करत आहे. यावेळी बऱ्याचवेळा तिचा तोलही जात आहे, मात्र तरीही दोघही व्हिडीओ काढण्याच व्यस्थ आहेत. विहिरीच्या बाहेर कुणीतरी या कपलचा व्हिडीओ काढत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रेल्वे स्टेशन जवळ येताच तुम्हीही ट्रेनच्या दरवाजात उभे राहता? मग हा भयंकर VIRAL VIDEO एकदा पाहाच

दरम्यान, लोक सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी काहीही करतात. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये लोकांनी फोटो, व्हिडीओसाठी धोकादायक ठिकाणं निवडली. अनेकांसोबत हे करत असताना दुखापतही झालेली समोर आली.

सोशल मीडियावर विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे, ज्यावर एखादी व्यक्ती काही दिवसात इतकी लोकप्रिय होऊ शकते की तो सेलिब्रिटी बनतो. तुम्ही अनेकांना रातोरात फेमस बनताना पाहिले असेल. काही लोक यासाठी अशा गोष्टी करतात, ज्याचा कोणी विचारही केला नसेल.