Couple dance on marathi song: सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, भांडण आणि स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तसेच लग्नातील अनेक डान्सचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील अनेकदा कपल डान्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल होत असतात.
लग्नसोहळा, एखादा कौटुंबिक कार्यक्रम आणि डान्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. एखाद्या घरात लग्नकार्य असलं, तर खास डान्स करण्यासाठीही विशेष कार्यक्रम ठेवण्याची पद्धत आता हळूहळू सुरू होतेय. अशा कार्यक्रमांमध्ये घरातली पुरुष मंडळीच काय, महिलादेखील डान्स करण्यात आघाडीवर असतात. अशा कार्यक्रमांमध्ये संपूर्ण घर सांभाळणारी महिला जेव्हा स्वतःमधलं डान्सचं टॅलेंट दाखवते, तेव्हा ते पाहून अनेकांना तिचं कौतुकही वाटतं. अशाच एका नवरा बायकोचा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.
लग्न म्हटल्यावर भरमसाठ नातेवाईक, पंचपक्वान आणि डीजेचा ताल या गोष्टी आल्याच. अशातच आता डान्सशिवाय लग्न पूर्ण होतच नाही. अशाच एका कपलने त्यांच्या हळदी समारंभात भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पाहून तुम्हीही कौतुक कराल.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत लग्नातील डान्सचा कार्यक्रम दिसून येत आहे. याच कार्यक्रमात एक कपल डान्स करताना दिसत आहे, मात्र हे कपल नवीन नवरा-नवरी नसुन लग्न झालेलं जोडपं म्हणजेच नवरा बायको आहेत. यावेळी दोघांनीही”हृदयी वसंत फुलताना” या गाण्यावर डान्स करत आहे. दोघही एकमेंकाना साथ देत उत्तम रित्या डान्स करत आहे. डान्स करताना दोघांच्या चेहऱ्यावर खुप आनंद दिसत आहे. सध्या यांचा डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवऱ्यानं सर्व नातेवाईकांसमोर बायकोसोबत डान्स केला आहे. तर बायकोही न लाजता भन्नाट नाचताना दिसत आहे. दोघही इतके जबरदस्त नाचले आहेत की, तुमचीही नजर हटणार नाही.
पाहा व्हिडीओ
आजकाल घरात लग्नाचं वातावरण असेल आणि दादा-वहिनीचा डान्स होणार नाही, असं सहसा होत नाही. अनेक वेळा घरातली सून, सगळ्यांची आवडती वहिनी जेव्हा डान्स फ्लोअरवर उतरून कमरेला साडीचा पदर बांधून नाचते, तेव्हा तिचं टॅलेंट पाहून अनेकांना तिचं कौतुक वाटतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले विविध प्रकारचे डान्स व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. यामध्ये केवळ मुलंच नाही, तर विवाहित महिलाही स्वतःचं कौशल्य दाखवतात.