Couple Romantic Dance Video Viral : शाहिद कपूर आणि करीना कपूर स्टारर ‘जब वी मेट’ चित्रपटातील ‘तुम से ही’ गाणं अनेकांना आवडत असेल. गायक मोहित चौहान यांनी गायलेल्या या गाण्यावर प्रेमीयुगुलांना रोमॅंटिक डान्स करायला आवडतं. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील गाण्याची आजही अनेकांना भुरळ पडली आहे. या गाण्याचे चाहते असणाऱ्यांनी रील्स बनवून सोशल मीडियावर शेअर केल्याचं अनेक व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे. आताही अशाच प्रकारचा एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुंबईच्या रस्त्यावर भर पावसात या जोडप्यानं ‘तुम से ही’ गाण्यावर रोमॅंटिक डान्स करून सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
एक कपल ‘तुम से ही’ गाण्यावर रोमॅंटिक अंदाजात मुंबईच्या रस्त्यावर डान्स करत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. दोघंही या गाण्याच्या माध्यमातून प्रेमाचे धागेदोरे घट्ट बांधताना दिसत आहेत. कपलच्या या जबरदस्त व्हिडीओनं तमाम नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. @theLostfirsbee नावाच्या ट्वीटर हॅंडलवर हा सुंदर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. फक्त हे, बाकी काहिच नाही. नजर लागली नाही पाहिजे, असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.
नक्की वाचा – काळ आला होता पण वेळा नाही! घाटात प्रवास करणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडीओ मिस करू नका
इथे पाहा व्हिडीओ
व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून जवळपास २ लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तर ३,८०० हून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. तर ७०० हून अधिक जणांनी हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे. काहींनी या व्हिडीओला भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, त्यांच्याकडे जे आहे ते मला पाहिजे.
तर अन्य एकाने म्हटलं, अशाप्रकारचं नातं शेवटपर्यंत जपलं पाहिजे. दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, अरे देवा! खूप सुंदर. पावसाळी हंगामात अनेक कपल्स धबधब्यांवर किंवा ट्रेकिंगला जाऊन निसर्ग सौंदर्याचं आनंद लुटताना दिसतात. पण या कपलने मुंबईच्या रस्त्यावर त्यांचं प्रेम या गाण्याच्या माध्यमातून जबरदस्त डान्स करत व्यक्त केलं. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.