फोटोशूट हा आजकालच्या लग्नाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. फोटोशिवाय लग्न करण्याचा कोणी विचारही करु शकणार नाही. लग्नातच नव्हे तर लग्न ठरल्यापासूनच फोटो काढायची नवी प्रथा आता उदयास आली आहे. ज्याला प्री-वेडिंग फोटोशूट असं म्हटलं जातं. जगभरात हे फोटोशूट मोठ्या हौसेने केलं जातं. आपल्या होणाऱ्या जोडीदाराबरोबर चांगले फोटो काढण्यासाठी जोडपे वेगवेगळ्या आयडीया शोधत असतात, इतरांपेक्षा आपले फोटो खास असावेत यासाठी ते प्री-वेडिंग फोटोशूटचे वेगवेगळे प्लॅनही करतात. पण कधी कधी हे फोटोशूट खूप अनोख्या पद्धतीने केलं जातं. सध्या असंच एक अजब-गजब प्री-वेडिंग फोटोशूट करणाऱ्या एका जोडप्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर काही लोकांनी डोक्याला हात लावला आहे, तर काहींना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे.
हो कारण या व्हिडीओतील जोडप्याने फोटोशूट करताना दोघेही मजेदार पोज देण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘हसना जरूरी है’ या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांचा अनोखा आणि मजेशीर व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “द “अंडरटेकर” प्रीवेडिंग शूट.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
व्हिडीओ पाहिल्यानंतर हसू आवरणार नाही –
व्हिडिओमध्ये, नवरीने गुलाबी रंगाचा गाऊन घातला आहे आणि नवरा कॅज्युअल ड्रेसमध्ये आहे. नवरीझाडाच्या फांदीचा आधार घेऊन नवऱ्याच्या खांद्यावर बसण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अनेक वेळा प्रयत्न करूनही तिला ते जमत नाही. त्यांचे हे प्रयत्न आणि हावभाव पाहून तुम्हालाही हसू आवरणं कठीण होऊ शकतं. या जोडप्याची पोज जेण्यासाठी झालेली अवस्था पाहून शेवटी एक मुलगा त्यांना मदत करण्यासाठी येतो आणि दोघांनीही त्या पोजमध्ये फोटो क्लिक केले, ज्यासाठी ते खूप प्रयत्न करत होते. फोटोमध्ये, मुलगी मुलाच्या गळ्यात पाय अडकवून उलटी लटकत आहे. या कपलच्या फोटोशूटचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
एका ट्विटर युजरने लिहिले की, या पोझसाठी मुलाने खूप मेहनत घेतली आहे, त्याचे आठवडाभराचे जेवण पचले असेल. दुसर्याने लिहिलं, “आजकालच्या लोकांना काय झाले आहे?” आणखी एका ट्विटर युजरने लिहिलं, “आजकाल लोकांना दिखावा करण्याची सवय लागली आहे.”