सोशल मीडियावर नेहमीच असे काही व्हिडीओ समोर येत असतात, जे आपल्याला आश्चर्यचकीत करतात. सध्या असाच एक विचित्र व्हिडीओ समोर आला आहे. राजधानी दिल्ली येथील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो ट्राफीक नियमांचं उल्लंघन करत आहे. शिवाय हे कृत्य धोकादायक देखील आहे. मागून येणाऱ्या एका कारमधून हा व्हिडीओ काढला गेला. जो नंतर ट्वीट करुन दिल्ली पोलिसांच्या ट्वीटर हँडलला तो टॅग गेला आहे.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची घेऊन पुढील तपास सुरु केला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, चालत्या बाईक वरुन एक तरुण जोडपं प्रवास करत होतं. एवढंच नाही तर त्यांची प्रवास करण्याची पद्धत फारच चुकीची होती. सार्वजनीक ठिकाणी असं कृत्य करत होते. तरुणाने तरुणीला बाईकच्या टाकीवर बसवले आणि मिठी मारायला सुरुवात केली. जे ट्राफिक नियमांचं उल्लंघन करत होतं. या व्हिडीओमध्ये तरुण बाईक चालवत आहे आणि त्याच्यापुढे एक तरुणी बसली आहे. जी त्याला मिठी मारत आहे. अशा विचित्र पद्धतीने गाडी चालवणे देखील चुकीचे आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – दुधसागर धबधब्याकडे जाणाऱ्या ट्रेकर्सला का काढव्या लागत आहे उठाबशा? पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाटयाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडिओला भरपूर व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच अनेकजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडिओवर काही जणांच्या संतप्त प्रतिक्रिया देखील आल्या आहेत.