एखादे जोडपे ‘रोमँटिक डिनर डेट’साठी एखाद्या आलिशान हॉटेल, कॅफे यांसारख्या ठिकाणांची निवड करतील. फारतर स्वतः एखादी जागा सजवून तिथे मेणबत्त्यांचा मंद प्रकाश करून जेवणाचे टेबल मांडतील. मात्र, सोशल मीडियावर एक अत्यंत थरारक आणि पोटात गोळा आणणारा रोमँटिक डेटचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेवणाचे टेबल मांडून बसण्याची जागा बघूनच आपल्या हृदयाची धडधड वाढेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परंतु, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर शेअर झालेल्या या व्हिडीओमध्ये नेमके असे काय आहे पाहूया. तर व्हिडीओमध्ये एक खुर्ची, त्याच्यासमोर गोल टेबल आणि पुन्हा त्या टेबलासमोर दुसरी खुर्ची आहे. टेबल-खुर्चीचा हा संपूर्ण संच जोडलेला आहे. त्यातील एका खुर्चीवर काळ्या रंगाचा सूट आणि काळ्या रंगाचे बूट घातलेला एक तरुण बसला आहे, तर दुसऱ्या खुर्चीवर पांढऱ्या रंगाचा लांब आणि सुंदर असा ड्रेस घातलेली तरुणी बसली आहे.

हेही वाचा : Video : गॅस वाचवण्यासाठी केलेला जुगाड पाहून नेटकरी चक्रावले; म्हणाले, “ओ ताई, एवढी बचत…”

त्या दोघांच्या समोर ठेवलेल्या टेबलावर फुलांच्या सजावटीसह वाईनचे दोन ग्लास आणि एका छोट्या आईस बकेटमध्ये वाईनची बाटली ठेवली आहे. तसेच दोघांच्या पुढ्यात काचेच्या प्लेटमध्ये खाण्यासाठी काही पदार्थ ठेवल्याचे पाहू शकतो. मात्र, हा संपूर्ण जेवणाचा बेत एका केबल वायरवर केलेला आहे. म्हणजे, जेवणाचे हे टेबल एका दणकट केबल वायरला जोडले असून त्यावर बसलेले तरुण-तरुणी चक्क खोल दरीच्यावर हवेमध्ये अधांतरी आहेत.

हे टेबल दरीमध्ये नेण्यासाठी एक व्यक्ती ते डोंगराच्या कड्यावरून हळूहळू पुढे ढकलत आहे, तर एक व्यक्ती या सर्व गोष्टीचा व्हिडीओ शूट करत आहे. खुर्चीवर बसलेली तरुणी अत्यंत शांत असून तिने खुर्चीला हाताने घट्ट धरून ठेवलेले आहे, तर समोरच्या खुर्चीवर बसलेला तरुण हा त्याच्या डोक्यावर असणाऱ्या केबल वायरल धरून त्याचे टेबल दरीच्या दिशेने नेत आहे, असे या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो. त्याचबरोबर या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीचा आरडाओरड करण्याचा आवाजदेखील येत आहे. मात्र, तो नेमका कोणाचा आवाज आहे हे समजत नाही.

हेही वाचा : धडाsssम! गाडीला बसली धडक… आता डेन्ट कसा काढणार? एक रुपयाही होणार नाही खर्च, पाहा ही जादू

आजूबाजूला सुंदर हिरवा निसर्ग, डोक्यावर शुभ्र ढग आणि पायाखाली खोल दरी अशा या हृदयात धडकी भरवणाऱ्या ‘रोमँटिक डेट’बद्दल नेटकाऱ्यांचे काय मत आहे पाहा.

“वाह! इतकी सुंदर आणि तणावपूर्ण डेट आजपर्यंत पहिली नाही”, असे एकाने लिहिले. “त्या मुलीने खुर्ची किती घट्ट पकडली आहे हे व्हिडीओमधून स्पष्ट समजत आहे.” दुसऱ्याने लिहिले. “aww .. मृत्यूच्या इतक्या जवळ घेऊन जाणारा अनुभव आणि अविस्मरणीय असा क्षण आहे.” तिसऱ्याने लिहिले आहे. “किमान त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी कमरेला पट्टा तरी बांधायला हवा होता”, अशी काळजी करणारी प्रतिक्रिया चौथ्याने दिली.

‘रोमँटिक डिनर’ असे कॅप्शन लिहिलेला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @avioneta_divertida नावाच्या अकाउंटवरून शेअर झाला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ६०.१ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple enjoying romantic dinner date mid air in valley video went viral on social media dha