लग्नासंदर्भातील प्रश्नांना कंटाळून घानामधील एक तरुणीने मागील वर्षी स्वत:शीच लग्न केले होते. या बातमीची इंटरनेटवर चांगली चर्चाही झाली. पण खरोखरच सज्ञान तरुणांना सर्वाधिक वेळा विचारला जाणार प्रश्न म्हणजे, ‘काय मग आता कधी करताय लग्न?.’ वायाची पंचवीशी ओलांडलेल्या प्रत्येक अविवाहित मुला-मुलीला हा प्रश्न कधी ना कधी विचारला जातोच. मात्र लग्न केल्यानंतरही पुन्हा दुसरा प्रश्न पाठलाग करतो आणि तो म्हणजे, ‘काय मगं, कधी देताय गोड बातमी?’ प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी हे दोन प्रश्न जवळच्या नातेवाईकांकडून तसेच मित्रमंडळींकडून विचारले जातातच. मात्र याच गोड बातमीच्या विचारपूस करणाऱ्यांना कंटाळून दक्षिण कॅरोलिनामधील एका दाम्प्त्याने भन्नाट उपाय शोधून काढला आहे.
नातेवाईक आणि मित्रांकडून सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर मेडीलीन ड्रेसेल आणि तिचा पती मिलाची यांनी भन्नाट उपाय शोधून काढला आहे. या दोघांनी १९५० ते ६० च्या दशकामधील लहान मुलांच्या आकाराऐवढ्या ७५ बाहुल्यांचे कलेक्शन जमा केले आहे. याच बाहुल्यांचा त्यांनी खोटं कुटुंब तयार करण्यासाठी उपयोग केला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर ‘ऑल माय प्लॅस्टीक चिल्ड्रन’ नावाने अकाऊण्ट सुरु केले आहे. या अकाऊण्टवरून ते त्यांच्या या व्हच्यूअल मुलांबरोबरचे फोटो शेअर करत असतात.
रोजच्या जीवनामध्ये पालक आपल्या मुलांबरोबर ज्याप्रकारे वेळ घालवतात तसाच वेळ हे दोघे या बाहुल्यांबरोबर घालवतात आणि त्याचे फोटोही ते या इन्स्टाग्राम अकाऊण्टवरून शेअर करतात. यामध्ये अगदी वाढदिवस, सण उत्सव साजरे करणे, पार्टी, जेवण बनवणे, भांडी घासणे यासारखी घरातील काम करतानाचेही फोटो त्यांनी या हॅण्डलवरून शेअर केले आहेत.
सुरुवातील आम्ही या बाहुल्यांबरोबरच फोटो काढून आम्हाला कधी आई-बाबा होणार असं विचारणाऱ्यांना ते पाठवले. त्यानंतर दैनंदिन जिवनातील अनेक कामे करतानाचे या बाहुल्यांचे फोटो आम्ही एका इन्स्टाग्रामवरून शेअर करु लागलो. आधी केवळ विनोद म्हणून आम्ही हे फोटो शेअर करायचो पण आता आम्हालाही या बाहुल्यांचा लळा लागला आहे. आम्ही या बहुल्यांचे कलेक्शन दिवसोंदिवस वाढवत असल्याचे मेडीलीन सांगते.
कधी ते बाहुल्यांना चालायला शिकवतानाचा व्हिडीओ शेअर करतात.
View this post on Instagram
तर कधी डायनिंग टेबलवर या बाहुल्या बसवून फॅमेली डिनरचा फोटो शेअर करतात.
View this post on Instagram
Here’s to family dinner time! #playpal #familygoals #dinnertable #doll #lifesizedoll #creepydoll
पाहा हा अनोख्या बर्थ डे पार्टीचा फोटो
या दोघांनी बाहुल्यांबरोबर जेवण करतानाचे फोटोही शेअर केले आहेत.
तर कधी या बहुल्या भांडी घासताना दिसतात
या सर्व बाहुल्यांना त्यांनी नावे ठेवली असून प्रत्येक सणाला त्यांना विशेष कपडेही घातले जातात. हा पाहा ख्रिसमसच्या वेळेचा फोटो
बाहुल्यांनाच मुलं मानणाऱ्या या दोघांना जुळ्या मुलीही आहेत.
View this post on Instagram
आता या दोघांना या बाहुल्यांचा लळा लागला असून त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही दिवसोंदिवस वाढत आहे. काहींना त्यांची ही कल्पना प्रचंड आवडली आहे असं या पोस्टखाली कमेन्ट करुन कळवले आहे. ‘गोड बातमी कधी देणार?’ या प्रश्नाला दिलेले हे उत्तर उत्तम असल्याचे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.