Couple fight at metro station: मुंबई लोकल ट्रेन असो किंवा दिल्ली मेट्रो; प्रवासादरम्यान लोकांमध्ये अनेकदा भांडण होतच असतात. आता ही भांडणं सर्वांसाठीच नेहमीची झाली आहेत. या भांडणात अनेक जण आपापल्या मर्यादा ओलांडतात आणि यामुळे काही भांडणं मारहाणीपर्यंत जाऊन पोहोचतात. अशात जर ते भांडण एखाद्या कपलमध्ये होत असेल तर लोक मध्यस्थी करायलाही मागत नाहीत. अनेकदा हे वाद टोकालाही जातात. कपलमध्ये भांडणं होणं काही नवीन नाही. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ वारंवार व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका कपलमध्ये जोरदार भांडण झालं. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…
दिल्ली मेट्रो स्थानकावर कपलचा राडासोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की दिल्ली मेट्रोच्या स्थानकावर एक कपल जोरजोरात भांडताना दिसतंय. हे भांडण इतक्या टोकाला जातं की हाणामारीपर्यंत पोहोचतं. यादम्यान तरुण जोरात तरुणीला ढकलतो आणि ती प्लॅटफॉर्मवर जोरात पडते.

इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला हा व्हिडीओ या @daily_24hour अकांउटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “दिल्ली मेट्रो मैं कपल के बीच हुई हाथापायी” (दिल्ली मेट्रोमध्ये कपलमध्ये भांडण झाले) अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ५ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

माणसाचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “माणूस म्हणून तो अपयशी ठरला.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “अजून करा भररस्त्यात तमाशे” तर तिसऱ्याने “याऐवजी तुझी बहिण असती तर काय केलं असतंस” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “जर मुलीचा आदरच करायला जमत नसेल तर रिलेशनशिपमध्ये जाताच कशाला”

Story img Loader