Couple fight at metro station: मुंबई लोकल ट्रेन असो किंवा दिल्ली मेट्रो; प्रवासादरम्यान लोकांमध्ये अनेकदा भांडण होतच असतात. आता ही भांडणं सर्वांसाठीच नेहमीची झाली आहेत. या भांडणात अनेक जण आपापल्या मर्यादा ओलांडतात आणि यामुळे काही भांडणं मारहाणीपर्यंत जाऊन पोहोचतात. अशात जर ते भांडण एखाद्या कपलमध्ये होत असेल तर लोक मध्यस्थी करायलाही मागत नाहीत. अनेकदा हे वाद टोकालाही जातात. कपलमध्ये भांडणं होणं काही नवीन नाही. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ वारंवार व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका कपलमध्ये जोरदार भांडण झालं. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…
दिल्ली मेट्रो स्थानकावर कपलचा राडासोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की दिल्ली मेट्रोच्या स्थानकावर एक कपल जोरजोरात भांडताना दिसतंय. हे भांडण इतक्या टोकाला जातं की हाणामारीपर्यंत पोहोचतं. यादम्यान तरुण जोरात तरुणीला ढकलतो आणि ती प्लॅटफॉर्मवर जोरात पडते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा