सोशल मीडियावर दररोज काहीतरी धक्कादायक व्हायरल होत असते. नुकताच एका कपलच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. वास्तविक, सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ मेट्रोमधील आहे. मेट्रोच्या आत बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडमध्ये जोरदार भांडण झाले आणि दोघांनी एकमेकांना चांगले चोपले आहे. हा जुना व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दिल्ली मेट्रोमधील व्हायरल व्हिडिओंची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाहीए. कधी कपलचा रोमान्स तर कधी महिलांच्या हाणामारीने मेट्रो चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर मेट्रोत नक्की चाललंय काय असा सवाल नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात होता. आता पुन्हा एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
या व्हिडिओमध्ये तरुण -तरुणींची शाब्दिक चकमक थेट हाणामारीपर्यंत गेल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वांसमोर तरुणीने या तरुणीची अशी काही धुलाई केली की प्रवासी बघतच राहिले..गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या या मारामारीचा व्हिडिओ आता चांगलाच चर्चेत आला आहे
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याचबरोबर नेटिझन्सही या व्हिडिओवर मजेशीर कमेंट करत आहेत. काही यूजर्स म्हणाले की हे प्रेम आहे का? त्याचवेळी काही युजर्सनी सांगितले की, अशा सार्वजनिक ठिकाणी भांडण करणे योग्य नाही.