Viral video: मुलं लहान असताना पालकांचे प्रेम हे मुलांसाठी सर्वोच्च असते. अनेकदा पालकांमधील भांडणाचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. एकत्र कुटुंब पद्धती आता फारच कमी पाहायला मिळत आहे. आई-वडिल आणि मुलं असा छोटा परिवार असतो. या कुटुंबात अनेकदा असं होतं की, पालकांमधील वादाचा परिणाम थेट मुलांवर होत असतो. कळत नकळत मुलांसाठी शिकण्याचा पहिला अनुभव पालक देत असतात. पालकांना बघून ही मुलं शिकत असतात. अशावेळी त्यांच्यासमोर या गोष्टी उभ्या राहिल्या तर त्यांच्या संगोपनासाठी त्या अतिशय घातक आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध एक जोडपे भांडताना दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या जोडप्याने लहान मुलाला रस्त्यावर एकटे सोडले आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण संताप व्यक्त करत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अचानक कारमधून खाली उतरल्याचे दिसून येते. यानंतर तो मागील गेट उघडतो आणि पत्नीचा हात धरून तिला बाहेर काढतो. तो एवढ्या जोरात पत्नीला ओढतो की ती लहान मुलासकट रस्त्यावर पडते. पती-पत्नीचा वाद इतका विकोपाला जातो की रस्त्यावर रडणारं मुलाचंही त्यांना भान उरत नाही. यावेळी आजूबाजूचे लोकंही मध्यस्थी करायला येत नाहीत. सर्वजण लांबून फक्त बघ्याच्या भूमीकेत उभे आहेत.दरम्यान एक व्यक्ती पुढे येऊन रडणाऱ्या मुलाला जवळ घेतो.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ चीनमधील असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @NoCapFights नावाच्या वापरकर्त्याने शेअर केला आहे. जो आतापर्यंत सुमारे चार दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेक जण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: आयुष्यापेक्षा नोकरी महत्वाची? ऑफिसला पोहोचण्यासाठी तरुण दोन्ही डब्ब्यांमध्ये लटकला
व्हायरल व्हिडिओवर लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर लोक आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘ही कसली मारामारी आहे.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘हे खूप वाईट पालक आहेत.’ त्याचवेळी आणखी एका युजरने ‘नकीक चूक काय होती?’