Viral video: नवरा बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते नाजूक, पण लग्न झाल्यानंतर नातं फुलत जातं तशी ही गाठ घट्ट होत जाते. आपली जोडी ही परमेश्वरानं स्वर्गातच बनवली असा जरी विश्वास असला तरी हे नातं प्रत्यक्षात टिकून राहाण्यासाठी नवरा बायको यांनाच प्रयत्न करावे लागतात. नवरा बायकोचे नाते म्हणजे उन सावलीचा खेळ. कधी रुसवा कधी फुगवा तर कधी खळखळून वाहणारा हास्याचा धबधबा. त्यामुळे या प्रेमात अनेकदा शब्दांचा वापर होतोच किंवा हे प्रेम शब्दात व्यक्त करता येतेच असे नाही. नवराब-बायको जसे सुखात एकत्र असतात तसेच एकमेकांच्या दुख:तही सारखेच भागीदार होतात तेव्हा ते नात आणखी टिकतं. एका पुरुषाला संघर्षाच्या काळात साथ देणाऱ्या तरुणीशिवाय आणखी काय हवं असतं. या काळात जर त्याच्या बायकोने, मैत्रीणीने साथ दिली तर तो कुठच्या कुठे पोहचू शकतो. याचंच एक उदाहरण देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, आयुष्याचा चित्रपट गाजवायचा असेल तर कष्ट करावेच लागतात. नवरा बायको यांच्यातील प्रेमाचा असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिवस प्रत्येकाचे बदलतात, आज आपल्या वाट्याला संघर्ष असेल तर तो कायम राहतो असं नाही फक्त या काळात मेहनत घेणं आणि आपल्या ध्येयाशी प्रामाणीक असणं गरजेचं असतं. अशाच एका जोडप्याचा संघर्ष त्यांना नाशिकवरुन थेट पॅरीसला घेऊन आलाय. तर त्याचं झालं असं की, हे नाशिकचे कपल सध्या कामानिमित्र पॅरिसमध्ये राहतात. यावेळी त्यांनी त्यांच्या जुन्या दिवसांची आठवण काढत आपण आयुष्यात किती पुढे आलो आहोत हे सांगितलं आहे.

Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Video Shows Man cleverness
थरारक! काही सेकंदांत होत्याचं नव्हतं झालं असतं; ‘तो’ रस्ता ओलांडत असताना वेगानं आली कार अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Shocking video Bride's Mother Cancels Wedding In Bengaluru After Groom's Drunken Misbehaviour video
VIDEO: “लेकीपेक्षा महत्त्वाचं काहीच नाही” लग्नात दारु पिऊन पोहोचला नवरदेव; नवरीच्या आईनं भर मांडवात काय केलं पाहा
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल

२०१४ ला नाशिक ते २०२४ ला थेट पॅरीस

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण जुन्या दिवसांची आठवण सांगताना म्हणतो, “२०१४ ला आकाशवाणी टॉवर नाशिकमध्ये आम्ही वाढदिवस साजरा केला होता. आज २०२४ ला पॅरीसमध्ये आयफेल टॉवरसमोर वाढदिवस साजरा करतोय. मला एवढंच सांगायचंय, पोरीनं जर साथ दिली तर माणूस कुठच्या कुठे निघून जातो. साथीदार कट्टर पाहिजे फक्त. हॅप्पी बर्थडे टू बायको” यावेळी या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सगळं सांगून जातोय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “घरी बनवला पिझ्झा…” वहिनींनी नवऱ्यासाठी भर कार्यक्रमात घेतला जबरदस्त उखाणा; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ @jhingat_sunnya या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज गेले आहेत. सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.  हा व्हिडिओ पाहून लोक खूप भावूक होत आहेत. एका यूजरने लिहिले की, “जर प्रेम खरे असेल तर एक व्यक्ती तुम्हाला मरेपर्यंत साथ देऊ शकते.” “खरा जीवनसाथी मिळणे खूप महत्वाचे आहे.”

Story img Loader