Girlfriend Boyfriend Viral Video : प्रेमात अखंड बुडालेली जोडपी तुम्ही आजूबाजूला पाहिली असतील. ही जोडपी एकमेकांना रोज भेटण्यासाठी खूप आतूर असतात. कामातून वेळ काढून कसंही दिवसातून एकदा किंवा वेळ मिळेल तेव्हा भेटण्याचे प्रयत्न करत असतात. जगाची पर्वा न करता ही जोडपी गुपचूप कधी बागेत, कॉफी शॉप तर कधी पार्कात एकमेकांना भेटतात. घरच्यांचा डोळा चुकवून ते एकमेकांना भेटतात खरे, पण कधीतरी ते कोणाच्या ना कोणाच्या तावडीत सापडतातच. असाच काहीसा प्रकार एका जोडप्याच्या बाबतीत घडला. गर्लफ्रेंडला भेटायला बॉयफ्रेंड गुपचूप तिच्या घरी आला, पण गर्लफ्रेंडच्या घरचे येताच तो चांगलाच गोत्यात सापडला. पण, यावेळी गर्लफ्रेंडने तिच्या बॉयफ्रेंडला कुठे लपवून ठेवले आणि नंतर काय घडलं तुम्हीच पाहा.

बॉयफ्रेंडच तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आला अन्…

अनेकदा प्रेमात पडलेली जोडपी कधी काय करतील सांगता येत नाही, सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा अशा घटना पाहिल्या किंवा वाचल्या असतील. अनेकदा घरात कोणी नसल्याचा फायदा घेत जोडपी एकमेकांच्या घरी भेटण्याचा प्लॅन करतात. पण, हा प्लॅन फसतो तेव्हा काय घडते हे या व्हिडीओतून दिसतेय. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, एक तरुणी बॉयफ्रेंडला रात्री उशिरा भेटण्याचा विचार करत होती, मात्र बॉयफ्रेंडच तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आला, याची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली, यामुळे तिचा असा पचका झाला की, तिने बॉयफ्रेंड पकडला जाऊ नये म्हणून चक्क त्याला कूलरमध्ये लपवून ठेवलं.

पण, कुटुंबातील सदस्यांना कूलरमध्ये काही हालचाल दिसली, त्यामुळे त्यांनी कूलर उलटा फिरवून पाहिला, तेव्हा प्रियकर कूलरमध्ये अगदी चोरासारखा लपून बसला होता. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल. ही घटना राजस्थानमधील एका गावातील असल्याचे सांगितले जात आहे. व्हिडीओमध्ये कुटुंबातील सदस्य जोडप्याला शिवीगाळ करताना दिसून येत आहे.

तसेच कुटुंबीय, हे सगळं करताना तुम्हाला लाज वाटली नाही का? अशा कडक शब्दांत दोघांना फटकारताना दिसत आहे. सोशल मीडियावर या घटनेबाबत लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक मुलीच्या हुशारीचे कौतुक करत आहेत, तर काहींना ही घटना फारच मजेदार वाटत आहे.