Couple Viral Video: प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही, असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असलं की, ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं. आजकाल उद्यान, ट्रेन अशा सार्वजनिक ठिकाणीही कपल्स अगदी जगाची चिंता न करता आपलं प्रेम व्यक्त करू लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही; पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक कपल रस्त्याच्या मधोमध एकमेकांना मिठी मारताना दिसतंय.

हेही वाचा… वो स्त्री है कुछ भी कर सकती है! दिवाळीच्या साफसफाईला केली दणक्यात सुरुवात; VIDEO पाहून पोट धरुन हसाल

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक कपल भररस्त्यात एकमेकांना मिठी मारताना दिसतंय. या कपलच्या मागे गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत; पण हे कपल रस्त्याच्या अगदी मधोमध रोमान्स करत आहे. थोडा वेळ वाट पाहून मग चालकही वैतागून गाडीतून उतरतात आणि त्या कपलच्या आजूबाजूला जमा होतात. तेवढ्यात ट्रॅफिक पोलिसदेखील येतात आणि सगळे या कपलला रस्त्यातून जाण्यास सांगतात. एवढा आरडाओरडा, भांडण सुरू असूनही हे प्रेमी युगुल काय रस्त्यातून हटतच नाही.

हा व्हिडीओ @bhartidevbrat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओला तब्बल १.४ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… VIDEO: “अरे तिच्या बापाला काय वाटलं असेल”, रत्नागिरीत कंडक्टरने विद्यार्थीनीची काढली छेड; मुलींनी दाखवला दुर्गावतार

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “अशा प्रकारे प्रेम करणाऱ्यांना कोणाचीही नजर लागू नये.” तर दुसऱ्यानं कमेंट केली, “ट्रॅफिक पोलिसांना खूप रिस्पेक्ट.” तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “असं प्रेम करायलाही हिंमत लागते.” “तुम्ही निर्लज्ज माणसासारखे चारचौघांत तुमच्या आई-वडिलांच्या इज्जतीचा लिलाव करीत आहात,” अशीही कमेंट एकानं केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple hugging each other in the middle of the road couple romance viral video dvr