Couple video viral: प्रेमात माणसं काहीही करतात असं म्हटलं जातं. तसंच प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही असंही म्हणतात. आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असलं की ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं. आजच्या काळात कपल्स गार्डनमध्ये, ट्रेनमध्ये अशा सार्वजनिक ठिकाणीही अगदी कशाचीही चिंता न करता आपलं प्रेम व्यक्त करू लागले आहेत.

प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही, पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. कुठेही अश्लील कृत्य करू लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक कपल चक्क रेल्वेस्थानकावर अश्लील चाळे करताना दिसत आहे.

Devendra Fadnavis EKnath shinde ajit Pawar
VIDEO : “शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”, अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
mahayuti vidhan sabha result
कलंकितांवरून कोंडी; शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे भाजपने ठरविण्यावर आक्षेप; राष्ट्रवादीसमोरही पेच
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
New CM of Maharashtra Devendra Fadnavis| BJP announced Maharashtra New Chief Minister
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक है तो सेफ है…”
viral video
“आता काहीजण बोलतील हा व्हिडीओ पुण्यातला नाही!” पुणेकरांनी दिले उत्तर, पाहा VIDEO

हेही वाचा… अरे जरा तरी लाज बाळगा! मादी श्वानाला शौचालयात नेलं अन्…, वृद्धाच्या विकृत कृत्याचा VIDEO व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये रेल्वेस्थानकावर एका तरुण आणि तरुणीचं अश्लील कृत्य करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रेल्वेस्थानकावर एक कपल किस करताना दिसत आहे. आजूबाजूची पर्वा न करता हे कपल बेभान होऊन आपल्याच जगात गुंतलेलं दिसतंय.

हा व्हिडीओ @alone_but_happy_21 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला मेरा देश बदल रहा है असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओ शेअर झाल्यापासून याला तब्बल २.७ मिलियन व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… आता एकमेकींचा जीवच घेतील! कानाखाली मारलं, झिंज्या उपटल्या अन्…, तरुणींचा भररस्त्यात राडा, पाहा VIDEO

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आई-वडिलांनी संस्कारच दिले नाहीत”, तर दुसऱ्याने “त्यांना जगू द्या, का त्यांचे असे व्हिडीओ बनवता” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “हे नक्कीच डोंबिवली स्थानक असणार.”

Story img Loader