Couple Kissing in Fair Viral Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात मजेशीर, तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून असे लोक अशा प्रकारचे व्हिडीओ करीत असतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही, असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असलं की, ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं. आजकाल गार्डन, ट्रेन अशा सार्वजनिक ठिकाणीही कपल्स अगदी जगाची चिंता न करता आपलं प्रेम व्यक्त करू लागले आहेत.
हेही वाचा… कॉलेजमध्येच मृत्यूने गाठलं! स्टेजवर डान्स करताना तरुणीने सोडले प्राण, नेमकं घडलं तरी काय? पाहा VIDEO
प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही; पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. कुठेही अश्लील कृत्य करू लागले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक कपल एका जत्रेत आकाशपाळण्यात किस करताना दिसतेय.
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एका ठिकाणी जत्रा भरलेली दिसत आहे. या जत्रेत एका आकाशपाळण्यात एक कपल बसलं आहे. जत्रेतील हा आकाशपाळणा मधोमध थांबलेला दिसत आहे. या आकाशपाळण्यातील हे कपल किस करताना दिसत आहे. भरजत्रेत या कपलचे अश्लील चाळे सुरू आहेत. कपलचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
हा व्हायरल व्हिडीओ @amanraj1299 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “बघा, आकाशपाळण्यात काय करतायत” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. या व्हिडीओला पाच लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिले, “आता यांच्या घरचे व्हिडीओ बघतील.” दुसऱ्याने कमेंट करीत लिहिले, “ज्याने व्हिडीओ रेकॉर्ड केलाय त्याला सलामी.” एक जण कमेंट करीत म्हणाला, “कॅमेरामॅनची नजर सगळीकडे असते.”
दरम्यान, आधीही कपलचे असे अनेक अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.